कचरा प्रक्रियेला दररोज १ लाख लिटर पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 09:28 PM2019-05-04T21:28:29+5:302019-05-04T21:29:41+5:30

चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प मनपातर्फे उभारण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यास मनपाला प्रक्रिया करता येईल. या कामासाठी दररोज १ लाख लिटर पाण्याची गरज भासणार आहे.

 1 lac liters of water per day in the garbage process | कचरा प्रक्रियेला दररोज १ लाख लिटर पाणी 

कचरा प्रक्रियेला दररोज १ लाख लिटर पाणी 

googlenewsNext

औरंगाबाद : चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प मनपातर्फे उभारण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यास मनपाला प्रक्रिया करता येईल. या कामासाठी दररोज १ लाख लिटर पाण्याची गरज भासणार आहे. एमआयडीसीकडून हे पाणी मिळावे यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. नक्षत्रवाडी येथे एसटीपी प्रकल्पातील शुद्ध केलेले पाणी वापरण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.


चिकलठाणा येथील प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. वीजपुरवठा मिळत नसल्याने महापालिकेच्या अडचणीत भर पडत आहे. शुक्रवारी वीज वितरण कंपनीने या कामाची साडेतीन कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. त्यामुळे दोन आठवड्यात मनपाला वीज मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विजेची अडचण दूर होताच आता पाणी प्रश्नाने डोके वर काढले आहे.

या प्रकल्पासाठी दररोज १ लाख लिटर पाणी लागणार आहे. त्यानुसार टाकीचे बांधकामही करण्यात आले आहे. या भागात पाण्याचाच पत्ता नाही. एक विंधन विहीर असून, या बोअरचे पाणी बांधकामासाठी वापरण्यात येत आहे. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले की, प्रकल्पाच्या परिसरातून एमआयडीसीची जलवाहिनी गेली आहे. एमआयडीसीकडे पाण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या एसटीपी प्लांटमधील प्रक्रिया केलेले पाणी टँकरने पुरवठा करता येईल का? याची चाचपणी करण्यात येणार आहे.
कचरा कोंडीनंतर पडेगाव, हर्सूल, कांचनवाडी, चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय झाला.

चिकलठाणा वगळता इतर प्रकल्पांची कामे सुरू आहेत. चिकलठाण्यात छोट्या १६ टन क्षमतेच्या दोन मशीनद्वारे सध्या दररोज ३२ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा अजब दावाही मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. दिवसभरात एक टन कचºयावरही प्रक्रिया होत नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. छोट्या मशीनद्वारे कचºयावर प्रक्रिया करण्याचा प्रयोग पूर्णपणे फसला आहे.
 

Web Title:  1 lac liters of water per day in the garbage process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.