वेकोलिने अनधिकृत वीज कनेक्शन कापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:09 PM2018-05-18T23:09:50+5:302018-05-18T23:10:01+5:30

वेकोलि परिसरात मोठ्या प्रमाणात बाहेर क्षेत्रातील नागरिकांनी घरे बांधून वेकोलिची वीज अनधिकृतपणे वापर करीत आहेत. त्यामुळे वेकोलिने अनधिकृत विजेचा वापर करणाऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली.

WCL cut off unauthorized power connection | वेकोलिने अनधिकृत वीज कनेक्शन कापले

वेकोलिने अनधिकृत वीज कनेक्शन कापले

googlenewsNext
ठळक मुद्देआर्थिक भुर्दंड : संतप्त गावकऱ्यांचा रस्ता रोको

लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : वेकोलि परिसरात मोठ्या प्रमाणात बाहेर क्षेत्रातील नागरिकांनी घरे बांधून वेकोलिची वीज अनधिकृतपणे वापर करीत आहेत. त्यामुळे वेकोलिने अनधिकृत विजेचा वापर करणाऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी सकाळी रस्ता रोको आंदोलन केले. दरम्यान वेकोलिने एक महिन्याची मुदतवाढ दिली असून वीज मंडळाच्या अधिकाºयांनी मीटर लावून देण्याचे आश्वासन दिले आहे.
वेकोलिच्या जमिनीवर अनेकांनी अनाधिकृत घरे बांधून वेकोलिची अनधिकृत विजेचा वापर करीत आहेत. विजेच्या अनाधिकृत वापरामुळे वेकोलिला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे वेकोलि घुग्घुस एरीयाचे वीज विभागाचे अधिकारी पांडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुरूवारपासून वीज कनेक्शन कापण्याची मोहिम सुरू केली.
त्यामुळे नागरिकांत संताप उफाळून आला. ही बाब लक्षात घेता सरपंच संतोष नुने, पंचायत समिती सदस्य निरिक्षण तांड्रा, भाजप शहर अध्यक्ष विवेक बोढे, ग्रामपंचायत सदस्य संजय तिवारी, सतिश कामपेली यांचे लक्ष वेधले. नेत्यांनी वेकोलिच्या अधिकाºयांशी चर्चा करून पुर्ववत वीज सुरू करावी, अशी मागणी केली. मात्र वेकोलिने मागणी धुडकावून लावली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रेल्वे सायडींग रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करून कोळशाची वाहने रोखली.
एक तास रस्ता रोको केल्यानंतर वेकोलि क्षेत्रीय वीज विभागाचे अधिकारी पांडे यांनी एक महिन्यापर्यंत वीज वापर करण्याची मुदत दिली. तर वीज पुरवठा करण्याची मागणी केल्यास त्या लोकांना वीज मंडळाकडून मिटर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अभियंता अमोल ढुमणे यांनी दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. वेकोलिच्या पुढाकारातून लवकरच वेकोलि वसाहतीत राहणाºयांना अधिकृत वीज जोडणी मिळणार आहे.

Web Title: WCL cut off unauthorized power connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.