सुरक्षा रक्षकांचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 11:50 PM2017-08-14T23:50:05+5:302017-08-14T23:50:23+5:30

वेकोलि चंद्रपूर क्षेत्रांतर्गत हिंदुस्थान लालपेठ कॉलरी, महाकाली कॉलरी, दुर्गापूर, पद्मापूर कॉलरी व अन्यत्र कार्यरत खासगी कंत्राटी सुरक्षा रक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाच्या ....

Union ministers of security guards | सुरक्षा रक्षकांचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे

सुरक्षा रक्षकांचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वेकोलि चंद्रपूर क्षेत्रांतर्गत हिंदुस्थान लालपेठ कॉलरी, महाकाली कॉलरी, दुर्गापूर, पद्मापूर कॉलरी व अन्यत्र कार्यरत खासगी कंत्राटी सुरक्षा रक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाच्या मागणीचे निवेदन भारतीय मजदूर संघ समन्वय समितीचे रमेश बल्लेवार, नगरसेवक श्याम कनकम यांच्या नेतृत्वात केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांना देण्यात आले.
मागील २० वर्षांपासून वेकोलिच्या विविध उपक्षेत्रात खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून हे सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. वेकोलि व्यवस्थापनाने या सर्व सुरक्षा रक्षकांना ३१ आॅगस्ट पासून कामावरुन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुरक्षा रक्षकांऐवजी होमगार्ड व अन्य प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांना या कामी सामावून घेण्यात येत असल्याने या सुरक्षा रक्षकांवर अन्याय करण्यात येत आहे. त्यामुळे हा अन्याय दूर करण्याच्या मागणीचे निवेदन ना. हंसराज अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेवून केली. यावेळी ना. अहीर यांनी कोणत्याच कर्मचाºयावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.
निवेदन देणाºया शिष्टमंडळात माजी नगरसेवक राजू कामपेल्ली, रामलू भंडारी, सुरक्षा रक्षक प्रकर्ष अग्निहोत्री, राजेश मिठावार, नरेश पुजारी, श्रीनिवास जुनमुलवार, राजू तोटावार, कुमार इवनूरी, रमेश मोकनपेल्ली, मल्लेश राऊत, व्यंकट स्वामी, राजन्ना हाथगोटा यांचेसह वेकोलि चंद्रपूरचे क्षेत्रातील अनेक सुरक्षाकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Union ministers of security guards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.