सुमोची कारला धडक, पाच गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:45 PM2018-02-06T23:45:28+5:302018-02-06T23:45:50+5:30

राज्य मार्गावरून जाणाऱ्या स्विप्ट डिझायर कारला समोरून टाटा सुमोची धडक बसली. या अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले.

Sumo car hit, five critically injured | सुमोची कारला धडक, पाच गंभीर जखमी

सुमोची कारला धडक, पाच गंभीर जखमी

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत
वरोरा : राज्य मार्गावरून जाणाऱ्या स्विप्ट डिझायर कारला समोरून टाटा सुमोची धडक बसली. या अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-चंद्रपूर मार्गावरील मजरा गावानजीक घडली.
एमएच ३१ सीएस ७३४३ या क्रमांकाची स्विप्ट डिझायर कार नागपूरकडून यवतमाळ जिल्ह्यातील कोसारा गावाकडे जात होती. दरम्यान माजरा गावानजीक टाटा सुमोची कारला समोरून धडक बसली. यात कारमधील शंकर टिकाराम टोंगे (३५), हंसराज शंकर ढोले (२४), स्वप्नील जगन टोंगे (३८), प्रवीण गजानन निरे (३०), जगनन झिबला टोंगे (४२) रा. सर्व कोसारा ता. झरी जामनी जि. यवतमाळ हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Web Title: Sumo car hit, five critically injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.