खासगी फायनान्स कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:06 AM2017-08-18T00:06:34+5:302017-08-18T00:06:55+5:30

जिल्ह्यात मागील बºयाच वर्षापासून मैत्रेय, एनआयसीएल, साईसुंदरम, साईप्रकाश, रोज व्हॉली, पीआयसीएल पल्स, एसजेएसव्ही, साई, अनमोल यासारख्या बºयाच कंपन्याचा सुळसुळाट झाला आहे.

Shivsena dams against private finance companies | खासगी फायनान्स कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेचे धरणे

खासगी फायनान्स कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेचे धरणे

Next
ठळक मुद्देशिवसेनच्या वतीने धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील बºयाच वर्षापासून मैत्रेय, एनआयसीएल, साईसुंदरम, साईप्रकाश, रोज व्हॉली, पीआयसीएल पल्स, एसजेएसव्ही, साई, अनमोल यासारख्या बºयाच कंपन्याचा सुळसुळाट झाला आहे. त्या माध्यमातून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनच्या वतीने धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यात नव्याने अनेक फायनान्स कंपण्या सुरु झाल्या. त्या कंपण्याद्वारे अनेक बेरोजगार युवक, महिलांना भरीव कमिशनचे आश्वासन देऊन गोरगरीब व सामान्य जनतेला फसविण्याचा खेळ सुरु आहे. दरम्यान, अनेकांची फसवणूक झाली आहे. या संदर्भात शासनाला अवगत करुनही जिल्ह्यातील प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संपूर्ण कंपनी एजंट, ग्राहक यांनी एकत्र येऊन आपली संघटना करावी, येणाºया सहा महिन्यात चंद्रपुरात एक आंदोलन करु, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांनी उपस्थिताना संबोधित करताना केले.
त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. निवेदन देणाºया शिष्टमंडळात शिवसेनेचे पदाधिकारी राजेश नायडू, वंदना हातगावकर, दुर्गा वैरागडे, गणेश शेंडे, प्रकाश चंदनखेडे, विशाल निंबाळकर, राजेश नायडू, माया पटले, सायली येरणे, रजनी चिंचोलकर, सुजाता बल्ली, सुधीर माजरे, विनोद गोल्लजवार, रुपेश पांडे, दिलीप बेंडले, कलाकार मल्लरप, पंकज गुप्ता, नितीन नागरीकर, विनोद गरडवा, विनोद अनंतवार, गौरव जोरगेवार, करणसिंग बैस, मुन्ना लोढे आदी उपस्थित होते.

Web Title: Shivsena dams against private finance companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.