आमचे घर परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:14 PM2018-09-17T22:14:46+5:302018-09-17T22:15:10+5:30

आर्थिक मदत करतो असे भासवून भद्रावती पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार संजय नगराळे यांनी फसवणूक करुन मनपातील कर्मचाऱ्याला हाताशी पकडून आमचे घर स्वत:च्या नावावर केले. त्यामुळे आमचे घर आम्हाला परत द्या, अशी मागणी करीत पदमाकर गीरसन ठवरे हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

Return our house | आमचे घर परत करा

आमचे घर परत करा

googlenewsNext
ठळक मुद्देसंपूर्ण कुटुंबाचे उपोषण : फसवणूक करणाऱ्यावर कार्यवाहीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आर्थिक मदत करतो असे भासवून भद्रावती पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार संजय नगराळे यांनी फसवणूक करुन मनपातील कर्मचाऱ्याला हाताशी पकडून आमचे घर स्वत:च्या नावावर केले. त्यामुळे आमचे घर आम्हाला परत द्या, अशी मागणी करीत पदमाकर गीरसन ठवरे हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
पद्माकर ठवरे हे मेक्यानिक असून बाबूपेठ येथील लुंबिनी नगर येथे त्यांचे घर आहे. पोलीस कर्मचारी संजय नगराळे हे आपले वाहन पद्माकर ठवरे यांच्याकडे दुरुस्तीसाठी आणत असल्याने त्याची ओळख झाली. ठवरे यांनी मागील चार वर्षांपूर्वी आर्थिक टंचाईमुळे नगराळे यांच्याकडून एक लाख ७० हजार रुपये तीन टक्के व्याजाने घेतले. यावेळी त्यांनी कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सही घेतली. त्यानंतर त्यांनी ठवरे यांना धोका देत घर विक्रीपत्र तयार केले. तसेच मनपा कर्मचाऱ्यांशी साठगाठ करुन घर टॅक्स पावतीवर आपले नाव चळविले. याबाबतची माहिती होताच ठवरे आपले घर आपल्या नावावर करण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र कोणतीच दखल घेन्यात आली नाही. त्यामुळे घरटॅक्स पावतीवरील संजय नगराळे यांचे नाव हटवावे, मनपातील अनियमित व गैरप्रकार करणाऱ्या लिपिकावर कार्यवाही करावी. यासाठी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाला कॉग्रेस कमिटीचे माजी महासचिव सुधाकर कातकर, हरीनाथ यादव, सुर्यभान डोंगे, सय्यद फारुख, यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

Web Title: Return our house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.