गिरनार चौकपर्यंत वीज वाहिन्या भूमिगत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 10:03 PM2018-08-11T22:03:29+5:302018-08-11T22:03:45+5:30

महावितरण चंद्रपूर विभागाच्यावतीने चंद्रपुरातील कस्तुरबा मार्गावरील कोलते हॉस्पिटल ते गिरनार चौक या अतिशय वर्दळीच्या परंतु अरुंद रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून उपरी वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात महावितरणने जनतेचे सहकार्य मागितले आहे.

Power channels will be underground till Girnar Chowk | गिरनार चौकपर्यंत वीज वाहिन्या भूमिगत होणार

गिरनार चौकपर्यंत वीज वाहिन्या भूमिगत होणार

googlenewsNext
ठळक मुद्देरस्त्याची अडचण दूर होणार : महावितरण चंद्रपूर विभागाने मागितले जनतेचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महावितरण चंद्रपूर विभागाच्यावतीने चंद्रपुरातील कस्तुरबा मार्गावरील कोलते हॉस्पिटल ते गिरनार चौक या अतिशय वर्दळीच्या परंतु अरुंद रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून उपरी वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात महावितरणने जनतेचे सहकार्य मागितले आहे.
एकात्मिक वीज सुधारणा कार्यक्रम आयपीडीएस अंतर्गत हे काम करण्यात येत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेची रीतसर परवानगी व रोड रेइन्स्टेटमेन्ट शुल्क, रोड कटींग शुल्क भरण्याच्या परवानगीसह सदर काम सुरु करण्यात आले असल्याचे महावितरणचे म्हटले आहे.
सदर कामामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथडा निर्माण होत असला तरी जनतेच्या हिताचे हो कार्यक्रम असून त्यांनाच उपरी वाहिन्यांपासून व रस्त्यावरील वीजखांबापासून सुटका मिळणार आहे. हे काम ग्राहकांना गैरसोयीचे होऊ नये यासाठी त्वरित पूर्ण करण्यात येत आहे. महावितरण ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
या कामात पेव्हर ब्लॉक सोडून त्यापासून थोडे थोडे अंतर सोडून रस्त्याचे बाजूने काम करण्यात येत आहे. पेव्हर ब्लॉकच्या खालील भागात बीएसएनएलची केबल व महावितरणची भूमिगत वीज वाहिनी गेली आहे. त्यांना धक्का लागू नये यासाठी पेव्हर ब्लॉक सोडून रस्त्याचे कडेने ही भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात येत आहे, असेही महावितरण म्हटले आहे.

Web Title: Power channels will be underground till Girnar Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.