मार्केटच्या बाहेर वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:58 AM2017-11-01T00:58:49+5:302017-11-01T00:59:11+5:30

येथील व्यापारपेठेच्या बाहेर जुन्या बसस्थानक शेडच्या जागेवर घाईघाईत वाहनतळ तयार करण्याची मागणी करून ठराव मंजूर करण्यात आला.

Parking outside the market | मार्केटच्या बाहेर वाहनतळ

मार्केटच्या बाहेर वाहनतळ

Next
ठळक मुद्देघुग्घुस ग्रामपंचायत : सदस्य-पदाधिकाºयांची भूमिका संशयाच्या भोवºयात

लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : येथील व्यापारपेठेच्या बाहेर जुन्या बसस्थानक शेडच्या जागेवर घाईघाईत वाहनतळ तयार करण्याची मागणी करून ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे पूर्वीच विविध विषयांवर ग्रामपंचायत पदाधिकाºयांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना यात आणखी भर पडली आहे. ग्रामपंचायत सदस्यांचे तत्काळ निर्णय व ग्रामसेवकाची भुमिका संशयास्पद ठरली याबाबत गावकºयांत चर्चा सुरू आहे.
२७ वर्षांपासून निरुपयोगी जुन्या बस शेडवरून चांगलेच वादळ सुरू झाले. शिवसेनेचे शहर अध्यक्ष मुन्ना लोडे यांनी २५ आॅक्टोबर रोजी दुर्लक्षित बस शेडची दुरूस्ती करून सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली. तशा वृत्तपत्रात बातम्या झळकल्या. दरम्यान २७ आॅक्टोबरला ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत त्या शेडच्या ठिकाणी वाहनतळ बनविण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला.
त्या परिसरात व्यापारी संकुल असले तरी त्याही पेक्षा अधिक आवश्यकता बॅक आॅफ इंडिया ते गांधी चौक, विद्या टॉकीज पंचशील चौक, ग्रामपंचायतीकडून गांधी चौक तर गांधी चौक ते पोळा मैदान अशा तिनही रस्त्यावर गजबजलेली व्यापारपेठ आणि वाहने दुकानासमोर उभे राहत असतात. रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतुकीला नेहमी अडथळा निर्माण होत असते. त्या परिसरात वाहनतळ बनविण्याची गरज आहे.
त्या परिसरात मुत्रीघर, सुलभ शौचालय बांधण्याबाबत गांधी चौकातील व्यापारी वर्गाने ग्रामपंचायतीकडे अनेकदा मागणी केली. मात्र त्याकडे ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी लक्ष दिले नाही. तर अचानक बस शेडचा सार्वजनिक वाचनालयाकरिता वापर करावा, अशी मागणी शिवसेनेने करताच काही नागरिकांनी वाहनतळाची मागणी केली आणि ते शेड कोणाच्या जागेवर, कोणाच्या ताब्यात आहे, याची चौकशी न करता तत्काळ ठराव मंजूर करण्यात आला आहे.
या शेडच्या समोर वाईनशॉप, बिअरबार होते. दारूबंदीच्या पूर्वी येथे दिवसभर गजबज असायची. दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर उभी असायची. तेव्हा वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यावेळी येथे वाहनतळ बनविण्याची कल्पना कुणाला सुचली नाही. मात्र सार्वजनिक वाचनालयाची मागणी करताच येथे वाहनतळ निर्माण होणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Parking outside the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.