मिनी मंत्रालय करणार १२ लाख वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:05 PM2018-06-25T23:05:42+5:302018-06-25T23:06:42+5:30

महाराष्ट्रात तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या वर्षात राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करायची आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील विविध गावात १२ लाख पाच हजार वृक्षरोपनाचे नियोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

Mini ministry to plant 12 lakh trees | मिनी मंत्रालय करणार १२ लाख वृक्ष लागवड

मिनी मंत्रालय करणार १२ लाख वृक्ष लागवड

Next
ठळक मुद्देनियोजन पूर्ण : जनजागृतीसाठी वृक्षदिंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्रात तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या वर्षात राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करायची आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील विविध गावात १२ लाख पाच हजार वृक्षरोपनाचे नियोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
जि. प. पदाधिकारी व अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यातील दोन गावात जाऊन वृक्षलागवड केली जाणार आहे. वृक्षलागवड गावातील स्मशानभूमी, रस्त्याच्या दुतर्फा, गावातील खुल्या जागा, शाळा, अंगणवाडीचे आवार, गावातील मोकळे चौक, याशिवाय गावातील शासकीय दवाखाने, शासकीय इमारतीच्या मोकळ्या जागामध्ये केली जाईल. तसेच गावस्तरावर या कामात पुरेपुर लोकसहभाग मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीस्तरावर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांची सभा घेऊन वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वी करण्याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे, नरेगामधून वृक्षरोपणासाठी खड्डे खोदकाम करण्याची कामे सुरू आहेत, अशी माहतीही भोंगळे यांनी दिली.
वनमंत्र्यांच्या हस्ते चित्ररथाचा शुभारंभ
वृक्षरोपणाचा कार्यक्रम जिल्ह्यातील गावागावात यशस्वी करण्याकरिता ‘वृक्षदिंडी २०१८’ चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते २७ जूनला या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला जाणार आहे. याद्वारा वृक्षरोपण व वृक्ष जगविण्याकरिता व वृक्षरोपणाचे महत्त्व गावागावातील नागरिकांना माहित व्हावे, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. वृक्षदिंडी गावागावात फिरवली जाणार असून गावस्तरावर याद्वारे वृक्षलागवड सभा, बैठका घेऊन ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला जाणार आहे.

Web Title: Mini ministry to plant 12 lakh trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.