कुणाल खेमणार चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:28 AM2018-07-13T00:28:26+5:302018-07-13T00:28:58+5:30

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. येथील जिल्हाधिकारी आशुतोष सलील हे अमेरिकेतील हार्वड लॉ स्कूल येथे उच्च शिक्षणासाठी जात असल्याने कुणाल खेमणार यांची चंद्रपूरला नियुक्ती झाली आहे.

 Kunal Khemwar new Collector of Chandrapur | कुणाल खेमणार चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी

कुणाल खेमणार चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारी स्वीकारणार पदभार : आशुतोष सलील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. येथील जिल्हाधिकारी आशुतोष सलील हे अमेरिकेतील हार्वड लॉ स्कूल येथे उच्च शिक्षणासाठी जात असल्याने कुणाल खेमणार यांची चंद्रपूरला नियुक्ती झाली आहे.
कर्तव्यदक्ष व सहज उपलब्ध होणारे जिल्हाधिकारी म्हणून आशुतोष सलील यांचे नावलैकिक होते. त्यांनी आपल्या दोन ते अडीच वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यात अनेक अभिनव योजना राबविल्या. मात्र ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जात असल्याने त्यांची जागा आता कुणाल खेमणार घेणार आहेत. ते १३ जुलैला पदभार स्वीकारतील.
मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातील सहकार कॉलनी येथील रोहिणी नगरचे रहिवासी असलेले कुणाल खेमणार हे २०११-१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी ८७ वी रँक मिळविली होती. देवगिरी कॉलेज येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘इंडो-जर्मन टुल्स’ मध्ये डिप्लोमा मिळविला आहे. त्यानंतर एमबीबीएस पदवीही उत्तीर्ण केली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत ते चंद्रपूरचा पदभार स्वीकारणार असून लोकाभिमुख व विकासात्मक कामांना आपले प्रथम प्राधान्य राहील, अशी माहिती नवनियुक्त जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title:  Kunal Khemwar new Collector of Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.