मालधक्क्यावर शेकडो टन खत भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:50 AM2018-07-02T00:50:24+5:302018-07-02T00:51:04+5:30

खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताचे वितरण मंजूर झाले असून युरिया (इफ्को) खताची रविवारी चंद्रपूरच्या मालधक्क्यावर रेल्वे व्हॅगन आली. येथील मालधक्यावर उतरलेले खत जिल्हाभरात ट्रकद्वारे पोहोचविले जाणार होते. मात्र मालगाडीतून खत खाली उतवून ठेवताच ते खत ट्रकमध्ये भरण्याआधीच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वाहतूकदारांनाही खतावर झाकण्याची संधी मिळाली नाही.

Hundreds of tons of fertilizer were found on the merchandise | मालधक्क्यावर शेकडो टन खत भिजले

मालधक्क्यावर शेकडो टन खत भिजले

Next
ठळक मुद्देचंद्रपुुरातील प्रकार : ट्रकच्या रांगा, सावरण्याआधीच मुसळधार पावसाची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताचे वितरण मंजूर झाले असून युरिया (इफ्को) खताची रविवारी चंद्रपूरच्या मालधक्क्यावर रेल्वे व्हॅगन आली. येथील मालधक्यावर उतरलेले खत जिल्हाभरात ट्रकद्वारे पोहोचविले जाणार होते. मात्र मालगाडीतून खत खाली उतवून ठेवताच ते खत ट्रकमध्ये भरण्याआधीच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वाहतूकदारांनाही खतावर झाकण्याची संधी मिळाली नाही. परिणामी शेकडो टन खत पावसाच्या पाण्याने भिजल्याचा प्रकार रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास चंद्रपूरच्या मालधक्क्यावर घडला.
रविवारी सकाळपासूनच वातावरण कोरडे असल्याने पावसाची कोणतीही शक्यता नव्हती. त्यामुळे मालगाडीने आलेला खत जमिनीवर उतवून ठेवण्यात आला. काही वाहतूकदारांनी खत ट्रकांमध्ये लोड केले. मात्र दुपारी १ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उघड्यावर असलेल्या शेकडो टन खतावर झाकणे शक्य झाले नाही. परिणामी शेकडो टन खत पाण्याने भिजला.
‘लोकमत’ने दुपारी २ वाजताच्या सुमारास प्रत्यक्ष पाहणी केली असता, खत असलेल्या जागेवर पाणी साचल्याने आढळून आले. काही ढिगांवर झाकण्यात आले होते. तर माल लोड करण्यासाठी ट्रकांच्या रांगा लागल्या होत्या.
मालधक्यावर उतरलेला माल साठवून ठेवण्यासाठी शेडची व्यवस्था नसल्याने हा प्रकार घडल्याची माहिती खत वाहतूक करणाºया ट्रकचालकांनी दिली.
मालधक्क्यावर असुविधा
चंद्रपूर येथील मालधक्क्यावर नेहमीच खत, धान्य व इतर वस्तू उतरविल्या जातात. मात्र उतरवलेला माल साठवणूक करण्यासाठी शेड नसल्याने लगेच मालाची उचल करावी लागते. याच मालधक्क्यावर रेल्वे व्हॅगनने आलेला माल गडचिरोली जिल्ह्यातही पोहचविला जाते. त्यामुळे येथे माल साठवणुकीसाठी शेडची नितांत गरज आहे. मात्र अशी कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने दरवर्षीच येथे उतरविलेला माल पावसाच्या पाण्यात भिजत असते. या मालधक्यावर कच्चा रस्ता असल्याने सर्वत्र खड्डे पडले आहेत. परिणामी ट्रक चालकांनाही मोठी कसरत करावी लागते.
खत विरघळणार
शेतपिकांना युरिया खत अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही पिकाची लागवड करणारा शेतकरी युरिया खताची मागणी करतो. युरिया खत पाणी लागल्यास सर्वात कमी वेळात विरघळणारा खत आहे. पावसाने भिजलेला खत आता शेतकºयांच्या माथी मारला जाणार असून ५० किलोची बॅग आता कमी वजनाची भरणार आहे. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार आहे. मात्र खताची गरज व पाण्याने खत भिजल्याची माहिती शेतकºयांना नसल्याने कृषी केंद्रात पुरवठा केला जाणार कमी वजनाचा हा खत बिनदिक्कत विकला जाणार आहे.

Web Title: Hundreds of tons of fertilizer were found on the merchandise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.