जिल्ह्यात ठिकठिकाणी रंगले फु टबाल सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 11:00 PM2017-09-16T23:00:02+5:302017-09-16T23:00:39+5:30

फेडरेशन आॅफ इंटरनॅशनल फुटबाल असोसिएशन मार्फत १७ वर्षाखालील विश्वचषक भारतात पार पडणार आहे.

Fu Tubaal Stands in the District | जिल्ह्यात ठिकठिकाणी रंगले फु टबाल सामने

जिल्ह्यात ठिकठिकाणी रंगले फु टबाल सामने

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांनी उद्घाटन करुन केला मोहिमेचा शुभारंभ : फुटबालमय भारत करण्याचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : फेडरेशन आॅफ इंटरनॅशनल फुटबाल असोसिएशन मार्फत १७ वर्षाखालील विश्वचषक भारतात पार पडणार आहे. त्यापूर्वी फुटबालमय भारत करण्याच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये फुटबाल स्पर्धा पार पडल्या.
लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय
भद्रावती : फुटबॉल स्पर्धेच्या प्रसारासाठी लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे ११ वी विरूध्द १२ असा मुलांचा फु टबॉलचा सामना पार पडला. विशेष म्हणजे ११ वीच्या संघाने १२ वीच्या संघावर मात केली.सदर सामन्याचे उद्घाटन प्राचार्य गोपाल ठेंगणे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी क्रीडा समिती प्रमुख देविदास जांभुळे, प्रा. सुरेश पसरवार, प्रा. विलास कोटागिरवार, प्रा. सचिव सरपटवार, प्रा. नितिन लांजेवार, प्रा.आकोजवार, प्रा. स्वाती गुंडावार,प्रा. कुंभारे, प्रा. गौरकर, प्रा. पारखी उपस्थित होते.
शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात
भद्रावती : येथील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय व विद्यालय येथे अवघा महाराष्ट्र फुटबॉल या कार्यक्रमातंर्गत शासनाच्या आदेशान्वये फु टबॉल स्पर्धा पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जयंतराव वानखेडे तर उद्घाटक म्हणून डॉ. प्रा. विशाल शिंदे, फिजिकल डायरेक्टर निळकंठराव शिंदे, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रा. कार्तीक शिंदे, डॉ. सुधिर मोने उपप्राचार्य, एम.यु. बरडे आदी मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. प्रा. विशाल शिंदे यांनी जिवनात खेळाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. फिफा मार्फ त १७ वर्षाखालील विश्वचषक भारतात घेण्यात येणार आहे. याच संकल्पनेतून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात फु टबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश चव्हान यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश हटवार यांनी तर उपस्थिताचे आभार ठाकरे यांनी मानले. त्यानंतर फु टबॉलचे सामने पार पडले. यात अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या संघाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, प्राध्यापक आदींची उपस्थिती होती.
विवेकानंद माध्यमिक विद्यालय
कानपा : येथून जवळच असलेल्या साठगाव येथील विवेकानंद माध्यमिक विद्यालयात मिहान फुटबॉल अंतर्गत फुटबॉल स्पर्धा पार पडली. सदर स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक के.एस.कुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी पं.स. सदस्य विजय गावंडे, निलकंठ गावंडे, नंदा बेंडे, निवटे आदी मान्यवर उपस्थित होते. फु टबॉल स्पर्धेमूळे विद्यार्थ्यांना खेळाविषयी आवड निर्माण होऊन भविष्यात त्यांना मोठे खेळाडू बनण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन मुख्याध्यापक के.एस.कुमरे यांनी व्यक्त केले. त्यानंतर फुटबाल सामन्याला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी वर्ग ९ ते वर्ग १२ वीच्या विद्यार्थ्यांचा फुटबाल सामना पार पडला.यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक प्रभाकर जुमनाके यांनी केले. संचालन अजय धात्रक यांनी तर उपस्थिताचे आभार कल्पना ठावरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी बुराणकर, क्षिरसागर, ताजने आदी प्रयत्न केले. यावेळी शाळेतील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
एफ ईएस गर्ल्स कॉलेज
चंद्रपूर : स्थानिक एफ .ई.एस.गर्ल्स कॉलेज येथे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या अवघा महाराष्ट्र फू टबॉलमय महाराष्ट्र मिशन १ मिलीयन उपक्रमाअंतर्गत फू टबॉल सामना पार पडला. सदर स्पर्धेचे उद्घाटन फि मेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूरचे अध्यक्ष अ‍ॅड विजय मोगरे, सचिव अ‍ॅड. पुरूषोत्तम सातपूते शाळा समिती अध्यक्ष गजानराव गावंडे प्राचार्य प्रभू चोथवे यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी मान्यवरांनी स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्राचार्य प्रभू चोथवे यांनी फू टबॉलचा प्रसार झाला पाहिजे, आंतराष्ट्रीय खेळाडू घडले पाहिजे, याविषयी आपले मन व्यक्त केले. महाविद्यालयातील सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांनी फू टबॉल सामन्यामध्ये सहभाग घेतला. स्पर्धेचे आयोजन प्राचार्य प्रभू चोथवे यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. आनंद वानखेडे यांनी केले संचालन प्रा. डॉ. मुकूंद देशमुख यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यपकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थीनीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Fu Tubaal Stands in the District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.