बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांकडून भरून घेणार प्रपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:41 AM2017-11-22T00:41:50+5:302017-11-22T00:42:08+5:30

भरघोस उत्पन्न मिळेल या आशेने बीटी कापूस बियाणे वापरणाºया शेतकºयांना यंदा बोंड अळीने हैराण केले.

Form filling up with bollded farmers | बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांकडून भरून घेणार प्रपत्र

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांकडून भरून घेणार प्रपत्र

Next
ठळक मुद्देकपाशीला बोंडअळीचा विळखा : भरपाईसाठी करता येणार दावा

राजेश मडावी।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : भरघोस उत्पन्न मिळेल या आशेने बीटी कापूस बियाणे वापरणाºया शेतकºयांना यंदा बोंड अळीने हैराण केले. जिल्ह्यातील कपाशीचे लागवड क्षेत्र वाढत असतानाच बोंड अळीने कपाशीवर आक्रमण केल्यावर नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी विभागाने शेतकºयांकडून आता प्रपत्र भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना या तालुक्यात यंदा कापसाचे लागवड क्षेत्र वाढले. धान उत्पादक म्हणून ओळखणाऱ्या ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल व सावली तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. जादा उत्पन्न मिळेल, या आशेने बीटी-२ या बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. मात्र, हे बियाणे यंदाच्या बदलत्या वातावरणात तग धरू शकले नाही. याचा जोरदार फटका कपाशीच्या उगवण क्षमतेवर झाला. शिवाय झाडाला बोंडे लागल्यानंतर गुलाबी बोंड अळीने विळखा घातला. त्यामुळे कपाशीचे बोंड काळपट झाले. यातून हेक्टरी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राजुरा, कोरपना तालुक्यातील त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीच्या प्रार्दुभाव झाल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारींचा ओघ वाढतच असल्याचे सध्या दिसून येत आहे. या तक्रारीची दखल घेवून कृषी विभागाच्या तपासणी पथकाने शेतशिवाराची पाहणी सुरू केली. दरम्यान, बोंड अळीच्या तक्रारीची संख्या अधिक असल्याने आता प्रपत्र भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
असे आहे प्रपत्र
नमुना-जी नियम १२ (१) नुसार शेतकºयांकडून हे प्रपत्र भरून घेण्यात येणार आहे. बियाणे कुठून खरेदी केले, प्लॉट क्रमांक, किती एकरांत लागवड केली, उगवण क्षमता कशी होती, याची नोंदणी या प्रपत्रातून घेण्यात येणार आहे. या प्रपत्राला ‘चार-ए प्रपत्र’ असे नाव देण्यात आले आहे.
प्रपत्रातून होणार नुकसानीचे मुल्यांकन
गुलाबी बोंड अळीच्या नुकसानीसंदर्भात माहिती घेण्यासाठी तसेच पिकाचे मुल्यमापन करण्यासाठी या प्रपत्राद्वारे नुकसानीचा दावा करता येणार आहे. बीटी कंपनीने भरपाईसाठी नकार दिल्यास संबंधित शेतकºयाला न्यायालयात दाद मागता येणार आहे.
सीसीआयचा आदेश धाब्यावर
बीटी-२ तंत्रज्ञानाद्वारे निर्माण केलेल्या कपाशी बियाणे संदर्भात केंद्रीय कापूस संस्थेने (सीसीआय) डिसेंबर २०१५ ला मार्गदर्शक सूचना जारी केले होते. या सूचनेला अनुसरूनच बीटी बियाणे वापरत असताना खबरदारी घेण्याचे राज्य शासनाने मान्य केले. त्यानुसार एक आदेशही देण्यात आला होता. मात्र, या आदेशाचे पालन न झाल्याने कृषी व्यवसायिक व दलालांच्या मार्फतीने बीटी बियाणे शेतकºयांच्या माथी मारण्यात आले. त्यामुळे ही गुलाबी बोंड अळी शेतीच्या जीवावर उठली आहे.

Web Title: Form filling up with bollded farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.