अपघातात वडील व मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:17 PM2018-05-20T23:17:39+5:302018-05-20T23:17:54+5:30

येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या जनकापूर फाट्याजवळील हायवे रोडवरील नाल्यावर धानाने भरलेल्या ट्रकची दुचाकी वाहनाला धडक बसली. यात दुचाकीवरील वडील व त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. सदर घटना रविवारी सकाळी घडली.

Father and daughter's death in accident | अपघातात वडील व मुलीचा मृत्यू

अपघातात वडील व मुलीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमुलगी जागीच दगावली : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (बा.): येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या जनकापूर फाट्याजवळील हायवे रोडवरील नाल्यावर धानाने भरलेल्या ट्रकची दुचाकी वाहनाला धडक बसली. यात दुचाकीवरील वडील व त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. सदर घटना रविवारी सकाळी घडली.
सकाळी ७ वाजताच्या सुमारास धानाने भरलेला ट्रक (क्रमांक एमएच- ४० एन- ३९९४) भरधाव वेगाने तळोधीकडे जात होता. जनकापूर नाल्याजवळ भरधाव वेगाने असलेल्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला (क्रमांक एमएच- ३४ बीजे १६९१) धडक दिली.
यात भुनेश्वरी मंगेश नागोसे (३) हिचा जागीच मृत्यू झाला तर तिचे वडील मंगेश गजानन नागोसे (३५) रा. किटाळी बोरमाळा तह. नागभीड गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र त्यांचाही वाटेत मृत्यू झाला.
घटनेनंतर ट्रॅकचालक पसार होण्याच्या प्रयत्नात असताना अचानक ट्रकही उलटला. त्यानंतर ट्रकचालक पसार झाला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. काही वेळातच ट्रकचालक रुपेश कुशल ठाकरे (२२) रा. तिरडी (भंडारा) याला पोलिसांनी अटक केली.

Web Title: Father and daughter's death in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.