दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:18 AM2019-06-24T00:18:29+5:302019-06-24T00:19:17+5:30

पावसाचे रोहिणी व मृग नक्षत्र संपले असून या नक्षत्रात जिल्ह्यात दमदार पाऊस बरसलाच नाही. केवळ एक ते दोन वेळा हलकासा पाऊस झाला. पावसाळ्यासारखे वातावरण असूनही पावसाने अजूनही जोर धरला नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत.

Farmer concerned in the district due to strong rain | दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकरी चिंतित

दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकरी चिंतित

Next
ठळक मुद्देमृग संपला : खरीप हंगामातील धानपिकाची लागवड लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कअअ
चंद्रपूर : पावसाचे रोहिणी व मृग नक्षत्र संपले असून या नक्षत्रात जिल्ह्यात दमदार पाऊस बरसलाच नाही. केवळ एक ते दोन वेळा हलकासा पाऊस झाला. पावसाळ्यासारखे वातावरण असूनही पावसाने अजूनही जोर धरला नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत. परिणामी दमदार पाऊस होत नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडले आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसापूर्वी आलेल्या पावसामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असतानच पावसाने पुन्हा दडी मारली आहे.
मृग नक्षत्र संपला असला तरी जोरदार पावसाचा पत्ता नाही. दुसरीकडे शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. २१ जूनला मृग नक्षेत्र संपला असून २२ जूनपासून आद्रा नक्षेत्रास प्रारंभ झाला आहे. सधारणत: धानपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाच्या आद्रा नक्षेत्रात पूर्ण होत असतात. आद्रा नक्षेत्राच्या उत्तरार्ध दुसºया आठवड्यात आषाढी एकादशीच्या दरम्यान प्रत्यक्ष धानपिकाच्या रोवणीस मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. मात्र यावर्षी वरुण राजाची वक्रदृष्टी असल्याने खरीप हंगामातील बाह्य मशागतीची सुद्धा अनेक कामे अद्यापही पूर्ण झाली नाही. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतजमीन नागरणीचे कामही रखडले आहे. सिंचन व्यवस्था असलेल्या काही शेतकºयांनी आपल्या शेतजमिनीत धानपिकांची पेरणी केली आहे. काही ठिकाणचे पºहेही उगवले आहे.
आता सुरु झालेल्या आद्रात नक्षत्रात पावसाने जोर मारल्यास जिल्ह्याच्या कही भागात धान रोवणीच्या कामास प्रारंभ होण्याची शक्यता आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. परिणामी नदी, नाले, तलावातील पाण्याने मार्च महिन्यापासून तळ गाठला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकºयांच्या निसर्गाकडे नजरा लागल्या आहेत.

लागवडीसाठी शेतकऱ्यांची धडपड
मागील वर्षी पीक हातात येण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दगा दिला. त्यामुळे अनेकांचे धान पीक करपले. तसेच पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाल्याने काही शेतकऱ्यांनी धानाची कापणीच केली नाही. तसेच उत्पादनातही मोठी घट आली होती. आर्थिक तसेच मानसिक संकट असतानाही शेतकरी पु्न्हा नव्या उमेदीने चालु वर्षातील हंगामाच्या तयारीला लागला आहे. मात्र निसर्ग साथ देत नसल्याने त्याची चिंता अधिकच वाढली आहे. सोयाबीन, कापूस उत्पादकाचीही हिच अवस्था असून अनेकांनी धूळपेरणी केली आहे. मात्र पावसाअभावी उगवणी झालीच नसल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे.

Web Title: Farmer concerned in the district due to strong rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.