७१ वर्षांनंतरही लालपरी सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:03 AM2019-06-01T00:03:57+5:302019-06-01T00:05:19+5:30

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे बिद्र असलेल्या आणि सर्वसामान्यांच्या हक्काच्या एसटीला आज ७१ वर्षे पूर्ण झाले आहे. लालपरी म्हणून ओळख असलेली एसटीने आजपर्यंत अनेक खरतड प्रवास अनुभवले. स्पर्धेच्या युगात आजही सामाजिक भान न विसरता अविरत काम करीत आहेत.

Even after 71 years of service, | ७१ वर्षांनंतरही लालपरी सेवेत

७१ वर्षांनंतरही लालपरी सेवेत

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रपूर विभागात १५४० कर्मचारी आणि २७५ बसेस दिमतीला

साईनाथ कुचनकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे बिद्र असलेल्या आणि सर्वसामान्यांच्या हक्काच्या एसटीला आज ७१ वर्षे पूर्ण झाले आहे. लालपरी म्हणून ओळख असलेली एसटीने आजपर्यंत अनेक खरतड प्रवास अनुभवले. स्पर्धेच्या युगात आजही सामाजिक भान न विसरता अविरत काम करीत आहेत. चंद्रपूर विभागात एक हजार ५०४ कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर २७५ बसेस नागरिकांना परिवहन सेवा देत धावत आहेत.
१ जून १९४८ मध्ये राज्यस्तरावर सुरु झालेल्या एसटीने १९७४ मध्ये विदर्भात प्रवेश केला. त्यांतर चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता १६ आॅक्टोबर १९७४ मध्ये चंद्रपूर विभागाची स्थापना करण्यात आली. यावेळी चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि गडचिरोली या तीन आगारांतर्फे केवळ ७५ बसेसच्या सहाय्याने सेवा सुरु करण्यात आली. त्यानंतर १७ जुलै १९९१ रोजी विभागाची स्वतंत्र इमारत व अद्यावत कार्यशाळा येथील ताडोबा रोड, तुकूम येथे बांधण्यात आली. त्यानंतर अहेरी, राजुरा, चिमूर व वरोरा येथे आगारांची निर्मिती करण्यात आली. गडचिरोली विभाग स्वतंत्र होण्यापूर्वी ५३० बसेसच्या सहाय्याने ६१० मार्गावर वाहतूक सुरू होती. त्यानंतर २६ जानेवारी २०१४ रोजी चंद्रपूर विभागातून गडचिरोली विभागाची स्वतंत्र्य स्थापना करण्यात आली. गडचिरोली विभागात ब्रह्मपुरी, गडचिरोली आणि अहेरी या ती आगारांचा समावेश आहे. सद्यस्थितीत चंद्रपूर विभागात चंद्रपूर, राजुरा चिमूर, वरोरा, मूल, बल्लारपूर, घुग्घूस, भद्रावती येथे महामंडळाचे बसस्थानक आहे.
पोंभूर्णा, अंचलेश्वर गेट, गडचांदूर येथे महामंडळाचे वाहतूक नियंत्रण कक्ष उपलब्ध आहेत. पोंभूर्णा, गडचांदूर व कोरपना येथे अद्यावत बसस्थानक बांधण्याबाबत प्रस्ताव तयार आहे. विशेष म्हणजे, बल्लारपूर येथील बसस्थानक एअरपोर्टच्या धर्तीवर बांधण्यात आले असून राज्यातून एकमेव देखणे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहे. तर चंद्रपूर येथील बसस्थानकाचे बांधकामही सुरु आहे. कितीही स्पर्धा वाढली तरी आजही ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवाशी प्रथम एसटीलाच पसंती देत प्रवास करीत आहेत.

१७, ३८६ विद्यार्थ्यांची भिस्त
सर्वसामान्यांची असलेली एसटीने आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचा प्रवासही सुखकर केला आहे. गावखेड्यातून तर शाळा महाविद्यालयापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी एसटीने लिलया पेलली असून आजमितीस १७ हजार ३८६ विद्यार्थी दररोज प्रवास करून शिक्षणाचे धडे घेत आहेत. यामध्ये चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा या तालुक्यातील चार हजार ९१५, राजुरा, बल्लारपूर, जिवती, कोरपना या तालुक्यातील ३२३, वरोरा, भद्रावती या आगारातून चार हजार २१९ विद्यार्थी प्रवास करतात.

स्पर्धेत टिकण्यासाठी विविध बदल
शिवसेनेरी, हिरकणी, यशवंती, परिवर्तन, अश्वमेघ त्यानंतर आता शिवशाही या विविध रुपात महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीला आणले. पत्र्यांची बांधणी जाऊन माल्ड स्टीलने बनविलेल्या गाड्या आल्या. अत्याधुनिक तंत्रज्ञान, आरामदायी आसनव्यवस्था, सुरक्षित उपाययोजना, वातानुकुलीत शयनयान कक्ष असे विविध बदल एसटीने करीत आजच्या स्पर्धेत आपले पाय रोवून ठेवले आहे.

अनेकांचे घडविले भविष्य
रस्ता तिथे एसटी असे समिकरण असलेली एसटी दुगम भागात केव्हाच पोहचली आहे. तिथे शिक्षण, आरोग्य अशा कोणत्याच सुविधा नाही, तिथी एसटी पोहचली आहे. यामुळे दुर्गम तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात येणे सोयीचे झाल्याने अनेकांनी आपले शिक्षण पूर्ण करीत भविष्य घडविले आहे. आजही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एसटीने प्रवास करीत शिक्षण घेत आहेत. आजही शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी एसटीची प्रतीक्षा करताना गावोगावी दिसतात.

खासगी वाहनाच्या तुलनेत एसटीला पसंती
खासगी बसच्या तुलनेमध्ये आजही सुरक्षित प्रवासासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवासी एसटीला प्रथम पसंती देतात. गावखेड्यात पोहचलेल्या एसटीने अनेक चांगले आणि वाईट प्रसंग अनुभवले. तरीही त्याच तोºयात एसटी धावत आहेत. विशेष म्हणजे, अनेकांनी लाल डब्बा म्हणूनही एसटीला हिनविले. मात्र तरीही आपल्या सेवेमध्ये एसटीने कधीच बदल पडू दिला नाही.

प्रवाशांनी एसटीने अपघातविरहीत सुरक्षित प्रवास करावा. काही सुचना सांगाव्या, त्या सुचनांचे स्वागत केले जाईल. आता परिवर्तन सेवा, स्मार्ट कार्ड योजना सुरु करण्यात आली असून या योजनांचाही प्रवाशांनी लाभ घ्यावा. नियमित आणि वेळेवर सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.
-आर. एन. पाटील,
विभागीय नियंत्रक, चंद्रपूर

Web Title: Even after 71 years of service,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.