गुंठेवारी प्लाटधारकांचे न्यायासाठी प्रशासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:59 AM2018-07-02T00:59:40+5:302018-07-02T01:00:20+5:30

सातबाऱ्यावर फेरफार करुन गुंठेवारी प्लाटधारकांना प्लाट देण्यात यावे, अन्यथा उपविभागी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा संघर्ष समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

Enforce the administration of plot holders for Gundewahi | गुंठेवारी प्लाटधारकांचे न्यायासाठी प्रशासनाला साकडे

गुंठेवारी प्लाटधारकांचे न्यायासाठी प्रशासनाला साकडे

Next
ठळक मुद्देनिवेदन सादर : गुंठेवारी प्लाटधारक संघर्ष समिती

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : सातबाऱ्यावर फेरफार करुन गुंठेवारी प्लाटधारकांना प्लाट देण्यात यावे, अन्यथा उपविभागी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा संघर्ष समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
शहरातील सेवानिवृत्त कर्मचारी, सामान्य नोकरदारवर्गाने सन २०१२ मध्ये ब्रह्मपुरी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या भूखंडामध्ये स्वत:चे एक घर असावे याकरिता प्लॉटची खरेदी केली होती. त्याची रीतसर नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालय ब्रह्मपुरी येथे शासकीय नियमानुसार मुद्रांक शुल्क भरून केलेली आहे त्यापैकी काहींनी तलाठी कार्यालय ब्रम्हपुरी येथे फेरफार करिता अर्ज सादर केला असता फेरफार करण्यास नकार दिला. तर काही विक्री केलेल्या प्लॉटधारकांचे फेरफार होऊन सातबारावर सामूहिक नावे आहेत. त्यामुळे ब्रह्मपुरी येथील जवळपास ४०० ते ५०० प्लाटधारक चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे शासनाला न्याय मागण्यांच्या उद्देशाने नागरिकांनी ब्रह्मपुरी गुंठेवारी प्लाटधारक संघर्ष समिती स्थापन केली. या संघर्ष समितीने अनेकदा आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, आयुक्त, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, यांना पाठविले. कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.
शासनाला न्यायाची मागणी करताना संघर्ष समितीचे अध्यक्ष वि. गो. विखार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तरीसुद्धा याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे एका महिन्यांच्या आत समस्या सोडविण्यात याव्या, अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ब्रह्मपुरी गुंठेवारी प्लाटधारक संघर्ष समितीने उपविभागीय अधिकाºयांना निवेदनातून दिला. निवेदन देणाºया शिष्टमंडळात संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Enforce the administration of plot holders for Gundewahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.