प्रकल्पग्रस्तांचे धनादेश वितरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 12:12 AM2018-11-09T00:12:26+5:302018-11-09T00:12:58+5:30

वेकोलि वणी क्षेत्रातील ताडाळी येथील क्षेत्रीय कार्यालयात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी पौनी-३, निलजई येथील प्रकल्पग्रस्तांचे धनादेश डिसेंबरअखेरपर्यंत वितरित करण्याचे निर्देश ना. हंसराज अहीर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Distribute checks of project affected | प्रकल्पग्रस्तांचे धनादेश वितरित करा

प्रकल्पग्रस्तांचे धनादेश वितरित करा

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे निर्देश : वेकोलि अधिकाऱ्यांसह बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वेकोलि वणी क्षेत्रातील ताडाळी येथील क्षेत्रीय कार्यालयात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी पौनी-३, निलजई येथील प्रकल्पग्रस्तांचे धनादेश डिसेंबरअखेरपर्यंत वितरित करण्याचे निर्देश ना. हंसराज अहीर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निर्देषक आर.आर. मिश्रा, कार्मिक प्रबंधक संजय कुमार, चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोंदकुरवार, वेकोलि बल्लारपूर, चंद्रपूर, वणी, माजरी, आणि वणी नार्थ क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
लवकरच सुरू होणाºया पौनी-३, निलजई या प्रकल्पाचे धनादेश डिसेंबर अखेरपर्यंत वितरित करावे व उकणी प्रकल्पाचे धनादेश जानेवारीपर्यंत वितरित करण्याचे निर्देश ना. अहीर यांनी दिले.
सदर प्रकल्पाच्या बाबतीत आर्थिक मोबदला बिल बनवून मंजुरीची प्रक्रिया अंतीम टप्पयात असून ना. अहीर यांच्या प्रयत्नामुळे सदर मोबदला बिल मंजुरी आता कोळसा मंत्रालयाऐवजी नागपूर मुख्यालयातूनच होणार आहे.
सदर बैठकीमध्ये पौनी-३ प्रकल्पात शासकीय महसूल जमिनीवर अतिक्रमण करून उपजिवीका करीत असलेल्या गरीब भूमीहिनांना पॉलीसीनुसार अधिग्रहणाचे लाभ देण्याचे निर्देशसुध्दा ना. अहीर यांनी दिले. तसेच पौनी-२ प्रकल्पात सेक्शन ९ (२)(अ)(ब) च्या पूर्ततेसाठी जमीन मालक प्रकल्पग्रस्तांना नोकरी प्रदान करण्याबाबत मंत्रालय स्तरावर सतत पाठपुरावा चालू असल्याची माहितीसुद्धा ना. अहीर यांनी दिली.
प्रकल्पग्रस्तांना वाहन कंत्राट व सिव्हील कंत्राटामध्ये आरक्षित कोट्यातून कामे देताना अनावश्यक बंधणे शिथील करण्याचे व जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्तांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देशसुद्धा ना. अहीर यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला भाजपा जिल्हा महामंत्री राहुल सराफ, जि.प. सभापती ब्रिजभुशण पाझारे, विजय पिदूरकर, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, धनंजय पिंपळशेंडे आदी उपस्थित होते.

Web Title: Distribute checks of project affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.