नरभक्षक वाघाला ठार करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:56 PM2019-02-25T22:56:51+5:302019-02-25T22:57:13+5:30

तालुक्यातील हळदा आवळगाव भुज. परिसरात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला होता. त्या वाघाला ठार करावे, या मागणीचे निवेदन कृतिसंसाधन समितीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.

Demand to kill cannibals | नरभक्षक वाघाला ठार करण्याची मागणी

नरभक्षक वाघाला ठार करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देकृतिसंसाधन समितीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : तालुक्यातील हळदा आवळगाव भुज. परिसरात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला होता. त्या वाघाला ठार करावे, या मागणीचे निवेदन कृतिसंसाधन समितीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा येथील जय धंदरे, गवर्ला येथील रविना भोयर यांच्यावर हल्ला करुन जखमी केले होते. तर साहिल सालोरकर (मुरपार), शालू डोंगरवार (पवनपार), खुशी ठाकरे (आवळगाव), सुरेंद्र ढोरे (चिचगाव), दिवाकर गेडाम (हळदा), अनिता गेडाम (पद्मापूर) यांना ठार केले आहे. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नरभक्षक वाघांना दिसताच गोळी मारण्याचे आदेश देण्यात यावे, वाघ व वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत वारसाला नौकरी द्यावी, मृताच्या कुटुंबाला नगदी ५० लाख रुपये द्यावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दर महिन्याला शिष्यवृत्ती द्यावी, ब्रह्मपुरी- पवनी रस्त्याचे रुंदीकरण करुन डांबरीकरण करावे, विद्यापीठात वार्षिक परीक्षा पद्धत आणावी, आदी मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी यशवंतराव खोब्रागडे, राजेंद्र मोटघरे, अरुण सुखदेवे, विजय चव्हाण, तुळशिदास कायलकर, उपसरपंच बाबुराव सातपुते, किमदेव ठाकरे आदी उपस्थित होते.

Web Title: Demand to kill cannibals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.