बांधकामात रेतीला क्रश सॅन्डचा पर्याय; शासनाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 02:38 PM2019-02-19T14:38:10+5:302019-02-19T14:38:45+5:30

आता बांधकामात रेतीला क्रश सॅन्डचा पर्याय समोर आला आहे. याला तज्ज्ञांनी व शासनानेही मान्यता दिली आहे.

Crush Sand option for sand; Government Recognition | बांधकामात रेतीला क्रश सॅन्डचा पर्याय; शासनाची मान्यता

बांधकामात रेतीला क्रश सॅन्डचा पर्याय; शासनाची मान्यता

Next
ठळक मुद्देकाळ्या गिट्टीपासून निघणारी भुकटी

प्रवीण खिरटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आता बांधकामात रेतीला क्रश सॅन्डचा पर्याय समोर आला आहे. याला तज्ज्ञांनी व शासनानेही मान्यता दिली आहे. मागील काही महिन्यापासून रेती घाटाचे लिलाव झाले नाही. त्यामुळे शासकीय व खासगी बांधकामे रेंगाळल्याची ओरड होवून मजुरांनाही काम मिळणार नसल्याचे मानले जाते. त्यामुळे आता मशीनमधून रेती तयार करण्यात येत आहे. या मशीनमधील रेतीला क्रश सॅन्ड (काळ्या गिट्टीची भुकटी) म्हणून ओळखले जाते.
मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील रेती घाटांचा लिलाव झाला नाही तर विदर्भात रेती घाटांच्या लिलावाचे प्रकरण न्यायालयात असल्याने रेती बांधकामाकरिता मिळणे दुरापास्त झाले होते. तर दुसरीकडे रेती चोरून विकली जात असल्याने ती महाग असूनही खासगी बांधकामे काही प्रमाणात सुरू आहे. शासकीय बांधकामात जे साहित्य वापरले जाते, त्याचा परवाना आवश्यक आहे. तो परवाना जोडल्याशिवाय कंत्राटदारांना देयके अदा केली जात नाही. त्यामुळे शासकीय बांधकाम करणाऱ्या कत्रांटदारांसमोर रेती हा मोठा प्रश्न उभा झाला होता. त्यामुळे शासकीय अनेक रस्ते, इमारती व इतरही कामे रंगाळले होते. काळ्या गिट्टीच्या क्रेशरमधून एका बाजूने गिट्टी निघते तर दुसºया बाजूने भुकटी निघत असताना यातील पावडर पाण्याने क्रेशरमधून धुतली जावून वेगळी काढली जाते व रेतीसारखे बारिक कन क्रश सॅन्ड म्हणून वापरण्याची परवानगी शासनाने दिली आहे. क्रश सॅन्ड वापरल्याने बांधकामाचा दर्जाही चांगला राहत असल्याचे मत बांधकाम तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. क्रश सॅन्ड व रेती यामधील दरातही फार मोठी तफावत नसल्याची माहिती बांधकाम कंत्राटदार सुनिल जवदंड यांनी दिली. त्यामुळे आता बांधकामात रेतीला पर्याय म्हणून क्रश सॅन्ड वापरल्या जाऊ शकते.

Web Title: Crush Sand option for sand; Government Recognition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू