चंद्रपुरातील रस्त्यांवरील धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 10:55 PM2018-08-06T22:55:59+5:302018-08-06T22:56:23+5:30

शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनपाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीचा वापर केला. त्यामुळे रस्त्यावरुन वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. परिणामी वाहनचालकांना समोरचे कोणतेही वाहन दिसत नसून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मात्र याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे.

Citizen's health risks in the streets of Chandrapur | चंद्रपुरातील रस्त्यांवरील धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

चंद्रपुरातील रस्त्यांवरील धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

googlenewsNext
ठळक मुद्देरस्त्याची दुरुस्ती करावी : खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनपाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीचा वापर केला. त्यामुळे रस्त्यावरुन वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. परिणामी वाहनचालकांना समोरचे कोणतेही वाहन दिसत नसून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मात्र याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे.
मागील महिन्यात चंद्रपुरात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे चंद्रपुरातील रस्ते पुर्णपणे उखळले. त्यामुळे रामनगर पोलीस स्टेशन ते बंगाली कॅम्प, सावरकर चौक ते वाहतूक कार्यालय, जटपूरा गेट ते रामनगर, दवाबाजार ते पाण्याची टंकी, तुकूम येथील गुरुद्वारा रोड, दुर्गापूर, महाकाली मंदिर ते बाग्ला चौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते दुध डेअरी, सपना टॉकीज ते रेल्वे स्टेशन आदी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले.
या खड्यांमुळे मागील महिन्यात चंद्रपुरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा बळी गेला. त्यानंतर मनपाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची मलमपट्टी सुरु केली. मात्र रस्त्यावर मातीमिश्रित साहित्याचा वापर केल्याने रस्त्यावरुन जळ वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धुळ उडते.
त्यामुळे त्या वाहनाच्या मागे असलेल्या वाहनचालक तसेच पदचाºयांना समोरचे काहीच दिसत नाही. परिणामी अपघाताची शक्यता आहे.
चंद्रपूर जिल्हा पूर्वीच प्रदूषणयुक्त म्हणून ओळखला जातो. आता धुळीमुळे नागरिकांना विविध आजाराला समोर जावे लागत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
श्वसनाच्या आजारात वाढ
शहरातील रस्त्यावर माती टाकल्याने वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असते. त्यामुळे नागरिकांना श्वसनाच्या विविध आजाराला सामोर जावे लागत आहे. चंद्रपूर जिल्हा प्रदूषणयुक्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पूर्वीच नागरिकांना विविध आजारांना सामोर जावे लागत आहेत. त्यातच आता मोठ्या प्रमाणात धुळ निघत असल्याने नागरिकांना आजार बळावण्याची शक्यता आहे.

धुळीमधून कॉर्बन, हायड्रोकार्बन वातावरणात समाविष्ट होतात. त्यामुळे श्वसनलिकेला त्रास होत असतो. परिणामी अस्थमा, दमा, छातीमध्ये पाणी, सर्दी, खोकला, आदी रोग नागरिकांना होण्याची शक्यता असते.
- मंगेश गुलवाडे,
कान, नाक, घसा, रोग तज्ज्ञ, चंद्रपूर

Web Title: Citizen's health risks in the streets of Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.