चिमूर, सावलीत काँग्रेस तर पोंभुर्णा येथे भाजप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:50 PM2018-05-29T23:50:25+5:302018-05-29T23:50:25+5:30

नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने मंगळवारी चिमूर येथील नगरपालिकेत तर सावली व पोंभुर्णा येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. चिमूर पालिकेत सत्ताधारी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून नगराध्यक्षपदी काँग्रेसचे गोपाल झाडे व उपाध्यक्षपदी तुषार शिंदे यांची निवड झाली. तर सावली येथे काँग्रेसने आपला गड कायम राखत नगराध्यक्षपदी विलास यासलवार तर उपाध्यक्षपदी भोगेश्वर मोहुर्ले यांची अविरोध निवड करण्यात आली. तसेच पोंभुर्णा येथे भाजपने आपला गड राखत नगराध्यक्षपदी श्रेता वागकर व उपाध्यक्षपदी रजिया कुरेशी यांची निवड झाली.

Chimur, Congress in shade and BJP in Pomburna | चिमूर, सावलीत काँग्रेस तर पोंभुर्णा येथे भाजप

चिमूर, सावलीत काँग्रेस तर पोंभुर्णा येथे भाजप

Next
ठळक मुद्देचिमुरात सत्तापालट : नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर/सावली/पोंभुर्णा : नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने मंगळवारी चिमूर येथील नगरपालिकेत तर सावली व पोंभुर्णा येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. चिमूर पालिकेत सत्ताधारी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून नगराध्यक्षपदी काँग्रेसचे गोपाल झाडे व उपाध्यक्षपदी तुषार शिंदे यांची निवड झाली. तर सावली येथे काँग्रेसने आपला गड कायम राखत नगराध्यक्षपदी विलास यासलवार तर उपाध्यक्षपदी भोगेश्वर मोहुर्ले यांची अविरोध निवड करण्यात आली. तसेच पोंभुर्णा येथे भाजपने आपला गड राखत नगराध्यक्षपदी श्रेता वागकर व उपाध्यक्षपदी रजिया कुरेशी यांची निवड झाली.
चिमूर नगरपालिकेत यापुर्वी भाजपची सत्ता होती. कार्यकाळ संपल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून गोपाल झाडे, भाजपाकडून भारती गोडे (जांभूळे) यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या सीमा बुटके, भाजपा समर्थीत तुषार काळे व काँग्रेस समर्थीत तुषार शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र सत्ताधारी भाजपकडे असलेले अपक्ष नगरसेवक आपल्याकडे वळविण्यात कॉग्रेसला यश आल्याने नगराध्यक्षपदी गोपाल झाडे व उपाध्यक्षपदी काँग्रेस समर्थीत उमेदवार तुषार शिंदे नऊ विरूद्ध सात अशा मताने विजयी झाले.
निवडणूक प्रक्रियेत नगरसेवकांचे हात उंचावून मतदान घेण्यात आले. पिठासीन अधिकारी म्हणून कल्पना निळ, मुख्याधिकारी मनोजकुमार शहा यांनी काम पाहिले.
तुषार शिंदेना काँग्रेसचा हात
निवडणूक प्रक्रीयेदरम्यान चिमूरचे नगरसेवक तुषार शिंदे यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मतदान प्रक्रियेची वेळ होत असतानाच त्यांना त्याच अवस्थेत रुग्णवाहिकेद्वारे आणले जात होते. तेव्हा रुग्णालयाच्या आवारात भाजपा कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिका अडवून तुषार शिंदे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. मात्र ठाणेदार दिनेश लबडे यांनी हस्तक्षेप केल्याने पोलीस बंदोबस्तात शिंदे यांना मतदानासाठी सभागृहात आणण्यात आले. यापुर्वी तुषार शिंदे भाजप गटाकडून अडीच वर्ष उपाध्यक्ष होते. मात्र यावेळेस त्यांनी काँग्रेसला साथ देत उपाध्यक्षपदी विजयी झाले.
पोंभुर्णा येथे महिला राज
पोंभूर्णा : येथील नगराध्यक्षपदी भाजपच्या श्वेता महेंद्र वनकर यांची तर उपाध्यक्षपदी भाजपच्या रजीया कुरेशी यांची निवड करण्यात आली. नगराध्यक्षपद एस.सी. महिलासाठी राखीव असल्याने काँग्रेसच्या सविता गेडाम व श्वेता वनकर या स्पर्धेत होत्या. सविता गेडाम यांना ६ मते तर श्वेता वनकर यांना ११ मते मिळाली. तर उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे अतिक अहमद कुरेशी यांना ६ तर रजिया इकबाल कुरेशी यांना ११ मते मिळाली.
विलास यासलवार, भोगेश्वर मोहुर्ले अविरोध
सावली : येथील नगराध्यक्षपदी काँग्रेसचे विलास यासलवार तर उपाध्यक्षपदी भोगेश्वर मोहुर्ले यांची अविरोध निवड करण्यात आली. सावली नगरपंचायतमध्ये काँग्रेसचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच तर बसपा एक व अपक्ष एक असे १७ नगरसेवक आहेत. नगराध्यक्ष पदाकरिता तीन नामांकन दाखल झाले होते. मात्र निवडणुकीच्या एक दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल करणारे गुणवंत सुरमवार आणि निलीमा सुरमवार यांनी आपले नामांकन परत घेतले. त्यामुळे विलास यासलवार यांची अविरोध निवड झाली. तर भोगेश्वर मोहुर्ले यांचीसुद्धा उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाली. यावेळी मावळत्या नगराध्यक्ष रजनी भडके, गटनेता छत्रपती गेडाम, शिला शिंदे, संगिता गेडाम, चंद्रकांत संतोषवार, योगीता बुगदलवार आदी उपस्थित होते.

Web Title: Chimur, Congress in shade and BJP in Pomburna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.