उत्तम नियोजनातून मिळेल यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:49 AM2018-01-05T00:49:57+5:302018-01-05T00:50:08+5:30

कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असल्याने कार्यकर्त्यांच्या संघटन शक्तीतूनच बलाढ्य पक्षाची उभारणी होत असते. समर्पित व निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळामूळे देशातील पहिल्या क्रमांकाचा राजकीय पक्ष म्हणून भाजपाने लौकिक संपादन केले आहे.

Better planning helps achieve success | उत्तम नियोजनातून मिळेल यश

उत्तम नियोजनातून मिळेल यश

Next
ठळक मुद्दे हंसराज अहीर : भाजपाचा बुथ विस्तारक मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असल्याने कार्यकर्त्यांच्या संघटन शक्तीतूनच बलाढ्य पक्षाची उभारणी होत असते. समर्पित व निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळामूळे देशातील पहिल्या क्रमांकाचा राजकीय पक्ष म्हणून भाजपाने लौकिक संपादन केले आहे. परंतु, इथपर्यंतच आपले कर्तव्य आहे, अशा भावनेत कार्यकर्त्यांनी न राहता पक्ष मजबूत करण्यासाठी योग्य नियोजन करावे, त्यातूनच आपल्याला यश येईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
बाबुपेठ मंडळाच्या वतीने चंद्रपूर महानगरातील बुथ विस्तारक मेळावा रविवारी संत रविदास सभागृहात पार पडला. त्या मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून कार्यकर्त्यांना संबोधित करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार नाना श्यामकुळे, उपमहापौर अनिल फुलझेले, भाजप जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक राजेश मून, भाजप जिल्हा महामंत्री राहुल सराफ, भाजप ज्येष्ठ नेते चंद्रशेखर गन्नुवार, नवनाथ धामनगे, भाजयुमोचे युवक नेते मोहन चौधरी, मुख्यमंत्री वॉररूमचे लोकसभा समन्वयक दिनेश रिंगणे, शिवाजी सेलोकर, किशोर बावने, बाबुपेठ मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, नगरसेवक तथा मंडळ महामंत्री श्याम कनकम, मंडळ महामंत्री उत्कर्ष नागोसे, गणेश गेडाम, राजू घरोटे, जितेंद्र धोटे, नगरसेविका ज्योती गेडाम, कल्पना बगुलकर, खुशबू चैधरी, निलम आक्केवार, राजू कामपेल्ली, रामलू भंडारी आदी उपस्थित होते.
यावेळी आ. श्यामकुळे म्हणाले, पक्ष संघटन हे प्रत्येकाने आपले कर्तव्य मानुन केले पाहिजे. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची ताकद आहे. या ताकदीचा संपूर्ण वापर करून भाजपाच्या पक्ष विस्तार कार्यात भर घालावी असे आवाहन त्यांनी केले. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या सोई सुविधांसाठी सतत झटत राहून बाबुपेठ परिसरात रस्ते, पेयजल व अन्य पायाभुत सुविधा भाजप लोकप्रतिनिधी तसेच भाजप नेतृत्वातील सरकारच्या राजवटीमध्येच उपलब्ध झालेल्या आहेत. याची जाणिव या महानगरातील विशेषत: बाबुपेठ वासीयांना आहे. यापुढेही विकासाच्या बाबतीत तडजोड न स्वीकारता विकासाने परिपूर्ण महानगराची उभारणी करू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी दीप प्रज्वलन करून भारतमाता व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतीमेस माल्यार्पण करण्यात आले. बुथ विस्तारक पदाधिकारी यांचे स्लाईड शोद्वारे प्रशिक्षण पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश मून यांनी केले. संचालन संदीप आगलावे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रज्वलंत कडू यांनी मानले.
यावेळी दशरथ सोनकुसरे, विजय कोंडस्कर, विनोद धकाते, बिसेन कोसे, जयेंद्र अडगुरवार, पुंडलीक उरकुडे, विजय मोगरे, मुकेश यादव, रामास्वामी पुरेड्डी, साईनाथ उपरे, राजेश वाकोडे, अमोल नगराडे, स्वप्नील मून, राहुल बोरकर, दौलत नगराळे, अनिल शेंडे, राजेश यादव आदी उपस्थित होते.
 

Web Title: Better planning helps achieve success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.