अस्मिता रथ करणार जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:01 AM2018-03-23T00:01:23+5:302018-03-23T00:01:23+5:30

ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना सन्मानाचे जीवन जगण्यास कटिबद्ध असणारी अस्मिता योजना शासनाने सुरू केली आहे.

Asmita Ratha Public awareness | अस्मिता रथ करणार जनजागृती

अस्मिता रथ करणार जनजागृती

Next
ठळक मुद्देदेवराव भोंगळे : अस्मिता योजनेने महिलांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना सन्मानाचे जीवन जगण्यास कटिबद्ध असणारी अस्मिता योजना शासनाने सुरू केली आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी अस्मिता योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली. या योजनेतून महिलांना सन्मान मिळणार असून या योजनेचा अस्मिता रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसार होणार आहे. या रथाला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
जिल्हा परिषदेच्या परिसरात अस्मिता रथासोबत कलापथकाचे सादरीकरण करून अस्मीता योजना विषयी महत्व पटावून दिले. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गोदावरी केंद्रे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, जि. प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, अर्थ व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख, उपस्थित होते.
अस्मिता योजना महिलांना आधार व सन्मान देणारी योजना असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले. अस्मिता योजनेच्या अंमलबजावणीसाठी उमेद अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहामार्फत अस्मिता मोबाईल अ‍ॅपद्वारे नोंदणी करून आॅनलाईन पद्धतीने मागणी करावयाची आहे. समूहामार्फत जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींना अस्मिता कार्डद्वारे मासिक एक याप्रमाणे एका वर्षात १२ प्रमाणे सॅनिटरी नॅपकीनचे ५ रूपये प्रमाणे वितरित केल्या जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना २४ व २९ रूपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण व सन्मान देणारी ही योजना आहे. अस्मीता जनजागृती रथ चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि सावली तालुक्यातून पुढे गडचिरोली जिल्ह्यात मार्गस्थ झाला.

Web Title: Asmita Ratha Public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.