पीक कर्ज दिले नाही तर बँकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:51 PM2018-06-26T22:51:19+5:302018-06-26T22:52:10+5:30

शासनाने बँकांच्या तिजोरीमध्ये कर्जमाफीचा निधी जमा केला आहे. मात्र अनेक बँकांकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा बँकांवर कारवाई करू, असा इशारा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दिला.

Action on banks, if not provided by crop loan | पीक कर्ज दिले नाही तर बँकांवर कारवाई

पीक कर्ज दिले नाही तर बँकांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाने बँकांच्या तिजोरीमध्ये कर्जमाफीचा निधी जमा केला आहे. मात्र अनेक बँकांकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा बँकांवर कारवाई करू, असा इशारा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दिला.
यावेळी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा यांच्यासह खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ना. अहीर म्हणाले, शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासाठी बँकांना निधी देण्यात आला आहे. खरीप हंगामात शेतकºयांना विनाविलंब सुलभतेने कर्ज मिळावे, यासाठी शासन पुढाकार घेत आहे. काही बँका या मोहिमेला गती देत नसल्याचे दिसून आले. अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल. बँकांना केंद्र व राज्य शासनाकडून निधी देण्यात आला. विविध योजनांचा निधी बँकांच्या खात्यात ठेवण्यात आला. शेतकºयांना पीक कर्ज दिले नाही, तर ही खाती बंद करून अन्य बँकेच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येईल, असेही ना. अहीर यांनी नमुद केले.
खासगी व जिल्हा बँकांमध्ये समन्वय ठेवून कर्ज वाटप करावे. राष्ट्रीयीकृत बँकांनी या मोहिमेमध्ये अत्यल्प कर्ज वाटप केल्याने संबंधित अधिकाºयांना या बैठकीत धारेवर धरण्यात आले. अ‍ॅक्सिस बँक, अलाहाबाद बँक, बडोदा व सिंडिकेट बँकांनी अत्यल्प कर्ज वितरण केले. या बँकांनी कर्ज वितरणामध्ये गती आणावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज वाटप करताना अडचणी पुढे आल्या. त्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकºयांना अधिकाधिक लाभ देताना नियमांमध्ये शिथिलता आणावी. यातील त्रासदायक अटी बदलण्याची ग्वाही ना. अहीर यांनी दिली. यावेळी आमदार धोटे यांनी राजुरा मतदारसंघातील जिवती, कवठाळा व पाटण येथे शेतकºयांना बँकांचे अधिकारी सहकार्य करीत नाही, असा आरोप केला. अशा बँकांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल म्हणाले, बँकेमध्ये जमा झालेल्या रकमा आणि यावर्षी शेतकºयांना देण्यात येणाºया कर्जाबाबत बँकांनी ताळमेळ बसवावा. शेतकºयांची कोणत्याही स्थितीत अडवणूक करू नका, अशी सूचनाही केली. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. एन. झा यांनी जिल्ह्यातील बँकेच्या कर्ज वाटप मोहिमेतील सहभागाची माहिती दिली. जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी तालुकानिहाय वाटप केलेल्या कर्जाची माहिती सादर केली. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण ६० हजार पात्र शेतकºयांना ३३७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ५५ टक्के वाटा उचलला आहे.

Web Title: Action on banks, if not provided by crop loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.