४५५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:47 PM2018-05-29T23:47:52+5:302018-05-29T23:48:04+5:30

निर्धारीत कार्यकाळ पूर्ण झालेल्या व बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या जिल्ह्यातील ४५५ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सोमवारी काढले. यामध्ये ३५८ सर्वसाधारण व ९७ विनंती बदल्यांचा समावेश आहे. बदलीपात्र कर्मचाºयांना ३१ मे पूर्वी बदलीच्या ठिकाणी रवाना करणयाबाबतचे आदेशही संबंधित ठाणेदारांना जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दिले आहेत.

455 transfers under police personnel's district | ४५५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

४५५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

Next
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचा आदेश : ३१ मे पर्यंत रुजू होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : निर्धारीत कार्यकाळ पूर्ण झालेल्या व बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या जिल्ह्यातील ४५५ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सोमवारी काढले. यामध्ये ३५८ सर्वसाधारण व ९७ विनंती बदल्यांचा समावेश आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांना ३१ मे पूर्वी बदलीच्या ठिकाणी रवाना करणयाबाबतचे आदेशही संबंधित ठाणेदारांना जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दिले आहेत.
मुंबई पोलीस मॅन्युअल-१९५९, भाग १ मधील नियम १६६ (५) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कामकाज पार पाडताना होणाºया विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५, महाराष्ट्र शासनाचे पोलीस अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या बदल्यांबाबत निर्गमित केलेल्या अद्यादेश सन २०१५ चे महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दोन नुसार जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेनुसार व निर्णयानुसार ज्या कर्मचाºयांची नेमणुकीच्या ठिकाणी खंडीत अथवा अखंडित पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा झाल्याने प्रशासकीय कारणास्तव या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या. तर ९७ कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्जानुसार सदर बदल्या करण्यात आल्या.
यामध्ये सर्वसाधारण गटातून २९ सहाय्यक फौजदार, १२४ पोलीस हवालदार, १०६ नायब पोलीस शिपाई, ९९ पोलीस शिपाई, तर विनंती अर्जानुसार तीन सहाय्यक फौजदार, १७ पोलीस हवालदार, १७ नायब पोलीस शिपाई, ६० पोलीस शिपाई आदींच्या बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी केल्या आहेत.
ठाणेदार शिरस्कर यांची बदली
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम २२ अन्वये पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ यांनी विहित कालावधी पूर्ण केलेल्या पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये बल्लारपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांची अमरावती ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. तर गोंदिया येथील अशोक तिवारी व नागपूर येथील दीपक खोब्रागडे यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे.

Web Title: 455 transfers under police personnel's district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.