जिल्ह्यात कुष्ठरोगाचे ३८५ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:22 PM2018-11-14T22:22:30+5:302018-11-14T22:22:53+5:30

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्ह्यात ३८२ नवीन कुष्ठरूग्ण मिळाल्याची माहिती पुढे आली. कुष्ठरोग निर्मूलनाकरिता सुरू केलेली शोधमोहीम, सर्वेक्षण आणि कुष्ठरुग्णांवर होणारा नियमित उपचार व जनजागृतीमुळे देशात कुष्ठरोगाचे प्रमाण कमी झाल्याचेही त्यात नमूद केले.

385 new patients of leprosy in the district | जिल्ह्यात कुष्ठरोगाचे ३८५ नवीन रुग्ण

जिल्ह्यात कुष्ठरोगाचे ३८५ नवीन रुग्ण

googlenewsNext
ठळक मुद्देजागृतीमुळे रूग्ण संख्येत घट : पोंभुर्णा, सिंदेवाही, मूल तालुक्यात सर्वाधिक रूग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्ह्यात ३८२ नवीन कुष्ठरूग्ण मिळाल्याची माहिती पुढे आली. कुष्ठरोग निर्मूलनाकरिता सुरू केलेली शोधमोहीम, सर्वेक्षण आणि कुष्ठरुग्णांवर होणारा नियमित उपचार व जनजागृतीमुळे देशात कुष्ठरोगाचे प्रमाण कमी झाल्याचेही त्यात नमूद केले.
कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभाग पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. मागील काही वर्षांपासून आरोग्य विभागाने कुष्ठरोग शोधमोहिम जोमाने सुरू केली होती. यावर्षीदेखील १४ दिवसांची कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. यामध्ये १६ लाख ५५ हजार ३४७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी केल्या गेली. आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवकाद्वारे ही मोहीम राबविण्यात आली. शहरी भागात २२५ तर ग्रामीण भागात १२३५ असे जिल्ह्यात एकूण १६० पथकाद्वारे शहरी भागातील एक लाख २८ हजार ९३३ व ग्रामीण भागातील १४ लाख पाच हजार ५३२ नागरिकांची तर महानगरपालिका क्षेत्रातील एक लाख २० हजार ९०२ अशा एकूण १६ लाख ५५ हजार ३४७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात पाच हजार २३० संशयित रूग्ण आढळून आले. या सर्व संशयित रूग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली होती. त्यातील ३८२ जणांना कुष्ठरोग असल्याचे निष्पन्न झाले. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार कुष्ठरोगाचे सर्वात जास्त प्रमाण मूल, पोंभूर्णा, सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी तालुक्यात आढळून आल्याचे सांगितले. याचे कारण म्हणजे या क्षेत्रात असलेले घनदाट जंगल, धानाची शेती, लोकात असणारी रोगप्रतिकार शक्तीची कमतरता व कुष्ठरोग जंतू निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण असणे यामुळे या भागात कुष्ठरोगाचे प्रमाण वाढत आहे.
कुष्ठरोग निर्मूलनाकरिता शासनाच्या आरोग्य विभागाद्वारा जनजागृतीवर जास्त भर दिला जात आहे. नागरिक जागरुक झाले आहे. लोक स्वत: दवाखान्यात येऊन कुष्ठरोगाचे उपचार करताना दिसतात. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नि:शुल्क तपासणी केली जात असून याचा लाभ घेण्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.
नियमित औषध व उपचाराने आजार नियंत्रणात
कुष्ठरोगावर नियमितपणे औषधोपचाराने आजार नियंत्रणात आणला जाऊ शकतो. मागील दहा वर्र्षांत कुष्ठरोगाचे प्रमाण कमी झाले आहे. सहा ते बारा महिन्याच्या उपचारानंतर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. शरीरावर पाच किंवा यापेक्षा कमी चट्ट्याचे व्रण असल्यास सहा महिन्यांचा उपचार दिला जातो तर यापेक्षा अधिक चट्टे असल्यास एक वर्ष औषधोपचार करणे अनिवार्य आहे.

Web Title: 385 new patients of leprosy in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.