ऑफिसातल्या सहकाऱ्यांशी मैत्री करताय ? हे वाचा ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 04:09 PM2017-07-28T16:09:52+5:302017-07-28T16:14:13+5:30

ऑफिसातल्या सहकार्यांशी मैत्री करणं हे सुद्धा एक स्कील आहे!

trying to be friend with office college you must know this | ऑफिसातल्या सहकाऱ्यांशी मैत्री करताय ? हे वाचा ..

ऑफिसातल्या सहकाऱ्यांशी मैत्री करताय ? हे वाचा ..

Next
ठळक मुद्देऑफिसचं राजकारण मैत्रीमध्ये येता कामा नये.मैत्रीत जी स्पर्धा नसते ती या प्रोफेशनल मैत्रीत असणारच!

 

-समिंदरा हर्डीकर -सावंत

माणूस नावाच्या सामाजिक प्राण्याला मित्र  बनवायला वेळ नाही लागत! आता तर काय प्रत्यक्ष भेट झालेली असो नसो, आपण फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅप फ्रेण्डस तरी सहज बनतो. गप्पा मारतो. त्यामुळे आपण कितीही प्रोफेशनल रहायचं ठरवलं आणि कामापुरतं नातं असं मनाशी घोकलं तरी ते काही खरं नसतं. कामाच्या ठिकाणी तर आपण दिवसातला सर्वाधिक वेळ घालवतो. आपल्या सगळ्या महत्वाकांक्षा त्या जागेशी कुठं ना कुठं जोडतच असतो. मात्र रोजच्या कामाचा व्याप सांभाळणं, सतत एकसारख्या वातावरणात वावरणं, एकसारख्या अनुभवांमधून सहकर्मचार्यांबरोबर एक प्रकारचं सहज नातं जुळून येतं. गप्पा-विनोद, शेअरिंग सारं सुरु होतं. अनेकदा आपली चांगली मैत्रीही होते.  पण व्यक्तिगत आयुष्यात आपण मैत्रीकडून ज्या अपेक्षा ठेवतो, त्याच अपेक्षांचा डोंगर जर व्यावसायिक मैत्रीत ठेवला तर घोळ, मनस्ताप अटळ आहे. आणि मग आपण म्हणतो की, मी तर सगळ्यांशी इतका फ्रेण्डली वागतो, तरी मलाच का त्रास होतो?

त्याचीच उत्तरं शोधण्याची ही काही सूत्रं.

 

1) कामाच्या ठिकाणी दोस्ती झाली. मस्त मैत्री झाली तर त्या युनिक वातावरणाला समजून घेणारा सवंगडी तुम्हाला लाभतो. रोजची कामाची आव्हानं, ऑफिसचा मूड, वरिष्ठांच्या अपेक्षा या सगळ्या न सांगता ओळखणारा एक माणूस तुमच्या दैनंदिन जीवनाशी एकरूप झालेला असतो. पण कितीही मैत्री असली तरी हे विसरु नका की आपण सहकारी आहोत, प्रोफेशनल सहकारी, प्रसंगी स्पर्धकही आहोत. त्यामुळे मैत्रीत जी स्पर्धा नसते ती या प्रोफेशनल मैत्रीत असणारच! हे लक्षात ठेवून वागा. आपण किती आणि काय शेअर करतो आहोत, याचा विचार करा.

2) मैत्री आहे म्हणून त्या नात्याचा आपल्या कामावर नकारात्मक  परिणाम होऊ देऊ नका. मैत्री आपल्या ठिकाणी आणि काम आपल्या ठिकाणी. एकमेकांन सहकार्य करा, पण एकमेकांच्या चुकांना उत्तेजन देऊ नका. हे असं मर्यादित कक्षेतलं नातं सांभाळणं कठीण नक्की असतं, पण अशक्य नाही.

3) कामापुरती, कॅलक्युलेटिव्ह मैत्री करू नका. छान सच्ची मैत्री असेल तर त्यात राजकारण येऊ देऊ नका. ऑफिसचं राजकारण मैत्रीमध्ये येता कामा नये. कधी कधी ओघात वाहून जात अनेकजण नकळत मित्राबरोबर राजकारण करतात. मग पस्तावतात. एकदा विश्वास गमावला की तो कमावणं फार अवघड.

4) अर्थात तरीही वास्तववादी दृष्टीकोन ठेवा. काम म्हटलं की प्रमोशन, प्रोजेक्ट, बॉसची नाराजी हे सर्व आलंच. तुम्हाला आणि तुमच्या मित्रला नेहमी सारखीच संधी मिळेल असं नाही. कधी तो तुमच्या पुढे ही जाऊ शकतो, कधी तुम्ही. हे स्वीकारण्याची आणि पचवण्याची ताकद तुमच्यात आहे का? कामापलिकडे मैत्री हे जपता येतं का ते पहा, तरच मैत्री करा.

5) मुख्य म्हणजे पर्सनल रु सवे फुगवे, भांडणं, नाराजी या सर्व गोष्टी कामानंतर कर. कामाचा वेळ वैयक्तिक वाटाघाटींमध्ये दवडू नका. मी इतकी सच्ची मैत्री केली, पण तरी तो माझ्याशी पॉलिटिक्सच करतो असं तुमचं मत असेल, तर वेळीच त्या नात्यापासून दूर जा.

6) मुख्य म्हणजे या नात्याविषयी पझेसिव्ह होऊ नका. आपल्या व्यावसायिक जगापलिकडे मित्राला जग आहे हे कायम लक्षात ठेवा.

7) सगळ्यात महत्वाचं ही सारी कसरत करणं तुम्हाला जमणार नसेल तर प्रोफेशनल कामापुरतं सौजन्याचं नातं ठेवा, गळ्यात गळे मैत्री नसली तरी चालेल, मैत्रीपूर्ण नातं असलं म्हणजे झालं!

8) तुम्हाला जर तुमच्या  सहकार्‍यांच्या रूपात मित्र मिळाले तर तुम्ही खरंच भाग्यवान. फक्त त्या मैत्रीची लक्ष्मणरेषा वेळीच ओळखा!

 

Web Title: trying to be friend with office college you must know this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.