ऑफिसात मोठय़ानं ढेकर देताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 03:54 PM2017-07-28T15:54:53+5:302017-07-28T15:58:55+5:30

ऑफिस काय आपलंच आहे; आपलं दुसरं घरच आहे; असं म्हणत किती सैल आणि बेताल वागायचं याला काही लिमिट?

how to behave in office & handle even your burping | ऑफिसात मोठय़ानं ढेकर देताय?

ऑफिसात मोठय़ानं ढेकर देताय?

Next
ठळक मुद्देढेकरं देत बसू नका, त्यापेक्षा अ‍ॅसिडीटीचं औषध घ्या. ढेकर आणि ठुसकुल्या, बॅड मॅनर्स!ऑफिसात कुणी असं वागलं तर हसू होणारच!बर्याच लोकांना शेजारच्याच्या कम्प्युटरमध्ये डोकवायची सवय असते.

- मृण्मयी सावंत

 

आपण मुलाखतीला जातो,

आणि मार ठसक्यात सांगतो की, सर मी पूर्ण मेहनत करीन, वाट्टेल तितका वेळ ऑफिसमध्ये थांबीन. खूप काम करीन! होतंही तसंच! नोकरी मिळाली की, 12-12, 14-14 तास अनेकजणांना काम करावं लागतं. काहीजण तर फक्त झोपण्यापुरते घरी जातात. पुन्हा उजाडलं की, ऑफिसात! अशी माणसं ऑफिसात हळूहळू इतकी सरावतात की, ऑफिस हे दुसरं घरच वाटू लागतं. आपली बसायची जागा, आपला जेवण्याचा ग्रुप, आपलं वागणं हे सारं घरच्याइतकं सैलसर होतं. आपण ऑफिसात आहोत, प्रोफेशनल जगात काम करतोय याचाही अनेकांना विसर पडतो.

 

जे आपल्याकडे होतं तेच आता जगाच्या कुठल्याही देशात होतं. अगदी अमेरिकतेही घडतं. अलीकडेच अमेरिकन ‘टाइम यूज’ नावाचा एक सव्र्हे करण्यात आला. त्यानुसार अमेरिकन तरुण सरासरी ऑफिसात 9 तास घालवतात. आधीच मोकळंढाकळं वातावरण. त्यामुळे एकदम सैल-सहज वावरू लागतात.

मात्र, या वागण्याचं नियंत्रण इतकं सुटतं की, आपण ऑफिसात आहोत, आपण काही गोष्टी नीट करायला हव्यात, पर्सनली आपण कसे का वागेना कार्यालयात वागण्याचे काही संकेत असतात याचंही भान या तरुणांचं सुटतं!

आणि म्हणूनच त्यांच्या कार्यालयीन वर्तनाचा अभ्यास करून त्यांना वागण्या-बोलण्याचे काही ‘बेसिक’ संकेत सांगण्यात आले आहेत. म्हणणं एवढंच की, किमान इतपत गोष्टी तरी कराच!

त्या वाचल्या की वाटतं, आपल्यासारख्या मुळातच मॅनर्स-एटीकेट्स आणि सामाजिक संकेत याबाबत घोर अज्ञानी असलेल्या समाजात तर हे सारं कुणी सांगतच नाही!

म्हणून ती सूत्रं. खास आपण लक्षात ठेवण्यासाठी!

काही सूत्रं जरा विचित्र वाटतील, पण जगभरात लोक ऑफिस एटीकेट्सचा किती गांभीर्यानं विचार करतात हे त्यातून नक्की कळेल!

1)  नॉक. नॉक

तुमची तुमच्या बॉसशी कितीही घसट असो, सहकार्‍यांशी मैत्री असो, नॉक केल्याशिवाय, वेळ आहे का, बोलू का, विचारल्याशिवाय त्यांच्या केबिन, क्युबिकलमध्ये शिरायचं नाही. ते जर म्हणाले की, नंतर बोलू तर ते ऑदरवाइज घेत गैरसमज करून घ्यायचे नाहीत.

2) डब्यात काय आणलंय?

आता हा काय प्रश्न झाला? आपल्याला जे आवडतं ते आणू डब्यात असं वाटतं अनेकांना पण तसं नाही. काही पदार्थाचे वास अत्यंत उग्र येतात, काही पदार्थ ऑफिसमध्ये शिष्टसंमत नसतात. मासे, कांद्याची पात, अगदी पॉपकॉर्नसुद्धा यांचे वास उग्र असतात. एसीमध्ये ते तसेच राहतात आणि अत्यंत घाण वास सुटतो. त्यामुळे असे पदार्थ ऑफिसात आणू नयेत.

3) स्पिकर फोन कशाला?

अनेकांना आधीच फोनवर मोठमोठय़ानं बोलायची सवय असते. त्यात आपण काम करतोय ते थांबू नये, म्हणून काहीजण स्पिकर फोन ऑन करून बोलतात. हसतात, गप्पा मारतात, असं कशाला त्यापेक्षा सरळ हेडसेट वापरा.

4) बसल्या बसल्या गप्पा

 अनेकांना बसल्या जागेवरून लांब बसलेल्या सहकारी मित्रांशी गप्पा मारायच्या असतात. ते मारतातही; मात्र त्यानं बाकीच्यांना डिस्टर्ब होतं, लोक तुम्हाला उल्लू समजतात. त्यामुळे गप्पा मारायच्याच असतील तर सरळ काम सोडा, उठा, आणि जवळ जाऊन बोला.

5) आवाज? - किती मोठा?

हळू बोला. किती मोठय़ानं तुम्ही बोलता याचा विचार करा, कामाचं बोलत असलात तरीही हळूच बोला.

6) नाक खुपसे

बर्‍याच लोकांना शेजारच्याच्या कम्प्युटरमध्ये डोकवायची सवय असते. नकळतही होतं त्यांचं. ते अत्यंत अशिष्ट मानलं जातं. ते पहिले थांबवा.

7) तुम्हाला गॅसेस झालेत का?

हा जरा अतीच पर्सनल प्रश्न. पण झाले असतील तर उगीच ठुसकुल्या सोडून सगळ्यांना त्रास देण्यापेक्षा सरळ वॉशरूममध्ये जा. काहीतरी औषध घ्या. ढेकरं देत बसू नका, त्यापेक्षा अ‍ॅसिडीटीचं औषध घ्या. ढेकर आणि ठुसकुल्या, बॅड मॅनर्स!

 

Web Title: how to behave in office & handle even your burping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.