शिल्पकलेतही करिअरच्या नव्या संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 02:01 AM2018-07-11T02:01:22+5:302018-07-11T02:02:11+5:30

शिल्पकला ही प्राचीन कालखंडापासून चालत आलेली कला आहे. आजही शिल्पकलेचे हे महत्त्व टिकून आहे. सेट डिझायनिंग आणि थ्रीडी अनिमेशन यांसारख्या करिअरच्या नव्या संधी शिल्पकलेला खुणावत आहेत.

Career new opportunities in sculpture | शिल्पकलेतही करिअरच्या नव्या संधी

शिल्पकलेतही करिअरच्या नव्या संधी

Next

शिल्पकला ही प्राचीन कालखंडापासून चालत आलेली कला आहे. आजही शिल्पकलेचे हे महत्त्व टिकून आहे. सेट डिझायनिंग आणि थ्रीडी अनिमेशन यांसारख्या करिअरच्या नव्या संधी शिल्पकलेला खुणावत आहेत. त्यामुळे या कलाक्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी आहेत.
शिल्पकला क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. पूर्वी पारंपरिक पद्धतीने शिल्पकलेचे शिक्षण दिले जात असे. शिल्पकलेच्या अभ्यासामध्ये शिल्पकलेचा इतिहास, शरीरशास्त्राचा अभ्यास (अवयवांची प्रमाणबद्धता), नैसर्गिक व मानवनिर्मित डिझाइन बनवणे, सृजनशील शिल्पे तयार करणे, तसेच व्यक्तिशिल्प, स्मारकशिल्प आदी विषयांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे, विविध माध्यमे वापरून शिल्प बनविण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. यात माती, प्लास्टर आॅफ पॅरिस, सिपोरेक्स, दगड, धातू, फायबर ग्लास, संमिश्र माध्यमे (लेदर, अ‍ॅक्रलिक व अन्य माध्यमांचा एकत्रित उपयोग करून निर्मिती करणे) आदींचा समावेश असतो. सौंदर्यशास्त्राचादेखील या अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे. दहावीनंतर एक वर्षाचा फाउंडेशन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येतो. यासाठी चित्रकलेची इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असून, फाउंडेशनच्या गुणांवरून प्रवेश दिला जातो.

इंटेरिअरसाठी होतोय शिल्पांचा वापर

काही वर्षांपूर्वी शिल्पकारांना केवळ व्यक्तिगत कामे मिळत असत (म्हणजे साधारणत: पुतळा बनविण्याची वगैरे), परंतु अलीकडे नवश्रीमंत वर्गामध्ये, तसेच कॉर्पोरेटमधून आॅफिसमध्ये शिल्पांचा इंटेरिअरसाठी वापर केला जातो. याबरोबरच चौकातील शिल्प, तसेच स्मारकशिल्पे यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. चित्रपटाच्या सेट डिझायनिंगमध्ये, तसेच स्टुडिओमध्येसुद्धा चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
शोरूम्स व मॉल्समध्येदेखील शिल्पांना चांगली मागणी आहे, तसेच स्मारक शिल्पे यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सिनेमाच्या सेट डिझायनिंग आणि स्टुडिओमध्येसुद्धा चांगल्या संधी उपलब्ध आहेत. शोरूम्स आणि मॉल्समध्येही शिल्पांना चांगली मागणी आहे. थ्रीडी अ‍ॅनिमेशनमध्ये पात्रांना तयार करण्यासाठी शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांची आवश्यकता असते. यामुळे अ‍ॅनिमेशन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ अलीकडे शिल्पकलेकडे वाढला आहे.
थ्रीडी अ‍ॅनिमेशनमध्ये शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे. थ्रीडी अ‍ॅनिमेशनमध्ये पात्रांना तयार करण्यासाठी या विद्यार्थ्यांची आवश्यकता असते. यामुळे अ‍ॅनिमेशन शिकणाºया विद्यार्थ्यांचा ओढा अलीकडे शिल्पकलेकडे वाढला आहे. शिल्पकला हे टीमवर्क आहे. यामुळे अगदी पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील आज काम मिळत आहेत.
गणपती वा देवीच्या मूर्ती बनविण्यासाठी शिल्पकलेचा अभ्यास उपयोगी पडत असला, तरी तो केलाच पाहिजे अशी आवश्यकता नसते. शिल्पकलेचा खूपच कमी वापर या व्यवसायात केला जातो. साच्यातून एकसारख्या मूर्ती घडवायच्या असल्याने, अनुभवाच्या जोरावर हे काम करता येते. रंगाच्या नवीन तंत्रामुळे रंग देण्याचे कामही अधिकच सोपे झाले आहे. एकूण या व्यवसायामध्ये पारंपरिक व अनुभवाने शिक्षण घेतलेलीच मंडळी अधिक असतात. विविध कामांसाठी डाय तयार करणे, ट्रॉफीज, तसेच पदके तयार करण्यासाठी टांकसाळीत नाणी बनविण्यासाठीदेखील शिल्पकलेचा उपयोग होतो.
 

Web Title: Career new opportunities in sculpture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.