बोलायला घाबरताय? सहा ‘पी’ घेतील तुमची काळजी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 02:01 PM2017-08-29T14:01:31+5:302017-08-29T14:03:13+5:30

या सहा गोष्टी लक्षात ठेवल्या, तर कधीही, कोणत्याही वेळी तुम्ही ठोकू शकाल अस्खलित भाषण

 Afraid to talk? Six 'P'Is will take care of your public speaking ! | बोलायला घाबरताय? सहा ‘पी’ घेतील तुमची काळजी !

बोलायला घाबरताय? सहा ‘पी’ घेतील तुमची काळजी !

googlenewsNext
ठळक मुद्देभाषणाचं थोडं प्लॅनिंग करा, कुठे, किती वेळ बोलायचं आहे, आॅडियन्स कोणता आहे, याचा विचार करा. भाषण करताना काही अपिलिंग उदाहरणं, थोडी विनोदाची पेरणी, आपली बॉडी लॅँग्वेज याकडे लक्ष दिलं तर आपलं भाषण नक्कीच बहारदार होईल.ज्या श्रोत्यांसमोर आपण बोलणार आहोत, त्यांना संभाषणात सहभागी करुन घेता आलं तर भाषण एकसुरी होणार नाही.

- मयूर पठाडे

जगातली कुठलीही अवघडातली अवघड गोष्ट तुम्ही मला सांगा, ती मी खात्रीनं करीन, पण भाषण करायला मात्र तुम्ही मला सांगू नका.. ते काही आपल्याला जमत नाही. आपण काम करणारी माणसं. खांद्यावर कितीही काम पडू द्या, मागे हटणार नाही, पण बोलायचं असेल तर मात्र दुसºया कोणाला तरी तुम्ही सांगा...
शंभरातले नव्वद टक्के लोकं तुम्हाला हेच सांगतील..
पण अगदी प्रत्येक वेळी तडाखेबंद भाषणच तुम्हाला करायचं असतं असं नाही, काही वेळा आपले मुद्दे पटवून द्यायचे असतात, लोकांना समजवून सांगायचं असतं, तर काही वेळी अगदी अचानकही तुमच्यावर भाषण करण्याची जबाबदारी येऊन पडते..
पण अशावेळी डगमगून जायचं काहीच कारण नाही. प्रत्येक गोष्ट प्रयत्नसाध्य असते आणि भाषणही त्याला अपवाद नाही. सहा ‘पी’ म्हणजे ‘पी’वरुन सुरू होणाºया या सहा गोष्टी फक्त तुम्ही लक्षात ठेवा.. त्याप्रमाणे थोडी प्रॅक्टिस करा.. तुमच्यातलं भाषणाचं भय आणि बागुलबुवा नक्कीच निघून जाईल.
तुम्हाला रोज भाषण करावंच लागतं अशातली गोष्ट नसेलही, पण या सहा गोष्टी नक्की लक्षात ठेवा, त्या तुमचा कॉन्फिडन्स कुठल्या कुठे नेऊन ठेवतील.
१- प्रॉपर प्लॅनिंग- भाषणाचं थोडं प्लॅनिंग करा, म्हणजे किती वेळ बोलायचं आहे, आॅडियन्स कोणता आहे? आॅफिसमध्ये बोलायचंय, कोणाचा सेन्डॉफ आहे किंवा गल्लीतल्या गणपती उत्सवाच्या कार्यक्रमात थोडं बोलायचं आहे?..
२- प्रिपरेशन- भाषणाची अगदी थोडी तयारी केली, तरी तुम्ही सहजपणे वेळ निभावून नेऊ शकाल. त्यासाठी अगदी शब्द न् शब्द पाठ करायची गरज नसते. तसं कधीच करूही नका. मुद्दे तेवढे लक्षात ठेवा. तुमचं ९० टक्के काम झालं म्हणून समजा.
३- प्रॅक्टिस. थोडा सराव करा. आरशासमोर उभं राहून बोला. वाटल्यास आपलंच बोलणं रेकॉर्ड करा, त्याचा मोबाइलवर व्हीडीओ काढा. खूप गोष्टी तुमच्या लक्षात येतील.
४- प्रोजेक्शन- सादरीकरणाकडे थोडं लक्ष द्या. भाषणात थोडा वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करा. आपल्या समोरच्या आॅडियन्सला आपला मुद्दा कसा पटवता येईल याचा थोडा विचार करा.
५- परफॉर्मन्स- आपल्याला कोणत्या ठिकाणी बोलायचं आहे, फक्त वाचून दाखवायचंय कि एखादा रिपोर्ट सादर करायचाय कि भाषण.. यावरुन त्याची पद्धत बदलेल. भाषण करताना काही अपिलिंग उदाहरणं, मध्येच थोडी विनोदाची पेरणी, आपली बॉडी लॅँग्वेज याकडे लक्ष दिलं तर आपलं भाषण नक्कीच बहारदार होईल.
६- पार्टिसिपेशन- ज्या श्रोत्यांसमोर आपण बोलणार आहोत, त्यांना जर संभाषणात सहभागी करुन घेता आलं तर आपलं भाषण एकसुरी होणार नाही. त्यासाठी त्यांचा मूड पाहाणं, मध्येच काही सोपे प्रश्न विचारणं.. अशा क्लृप्त्या करता येतील.

Web Title:  Afraid to talk? Six 'P'Is will take care of your public speaking !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.