जिल्हा परिषद शाळांचा विद्यार्थी टक्का वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:17 PM2019-07-13T13:17:00+5:302019-07-13T13:17:10+5:30

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधून तब्बल तीन हजार ४१५ विद्यार्थींनी प्रवेश घेतल्याचे सुखावणारे चित्र निर्माण झाले आहे.

Zilla Parishad School students number increased in Buldhana | जिल्हा परिषद शाळांचा विद्यार्थी टक्का वाढला!

जिल्हा परिषद शाळांचा विद्यार्थी टक्का वाढला!

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शैक्षणिक स्पर्धेच्या आजच्या युगात ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाची धुरा सांभाळणाऱ्या जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेबाबत एक प्रकारची ओरड होत असतानाच बुलडाणा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधून तब्बल तीन हजार ४१५ विद्यार्थींनी प्रवेश घेतल्याचे सुखावणारे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना पुन्हा एकदा चांगले दिवस येण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल पडत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या दोन वषार्पासून ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या कार्यक्रमांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सांघिक प्रयत्नाचे हे यश मानल्या जात आहे. विशेष म्हणजे २०१९-२० या शैक्षणिक वषार्पासून बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ५ शाळांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नता केली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात आता जिल्हा परिषदेच्या एकूण ६ शाळा आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात एकूण एक हजार ४३७ जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळा आहेत. पालिका प्रशासनाच्या १०७ शाळा आहेत. या शाळा प्रामुख्याने शासकीयशाळा म्हणून ओळखल्या जातात. यापैकी जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या प्रामुख्याने ग्रामीण भागातच आहे. खाजगी व्यवस्थापनाच्या स्वयं अर्थसहाय्यित शाळांची वाढती संख्या व आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर लक्षात घेता या शाळांसमोर तगडे आव्हान निर्माण झालेले आहे. परंतु, शासनाने हाती घेतलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, लोकसहभाग व डिजिटल शाळांच्या महत्वाकांक्षी गुणवत्ताविषयक कार्यक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांच्या सर्वसाधारण गुणवत्तेत वाढ झाल्याचे एक सुखावणारे जिल्ह्यात निर्माण झालेले आहे. यासंदर्भात पुणे येथील शिक्षण क्षेत्रात काम करणाºया श्यामची आई फाऊंडेशन या संस्थेने सुध्दा जिल्हा परिषद शाळांमधील वाढत्या पटसंख्येचे निरीक्षण नोंदविले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या संलग्नित शाळांमध्ये सुध्दा वाढ झाली असून त्यांची संख्या आता सहावर पोहोचली आहे. त्यामध्ये वरखेड, धोत्रा, सावरगाव, बोराखेडी, टिटवी व वडोदा या शळांचा समावेश आहे.


बुलडाण्यात विद्यार्थ्यांची संख्या अधिक
अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्ह्यात एक हजार ७१५ विद्यार्थ्यांनी खासगी शाळेचा मार्ग सोडून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला आहे. अकोला व वाशिम या जिल्ह्यात १,३१७ व १,७७९ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांकडे वळले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ३०४० विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत परतले असून बुलडाणा जिल्ह्यात हे प्रमाण सर्वाधिक ३४१५ एवढे आहे.

Web Title: Zilla Parishad School students number increased in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.