महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्गी

By admin | Published: November 9, 2014 11:15 PM2014-11-09T23:15:07+5:302014-11-09T23:15:07+5:30

खामगावात सर्वेक्षण पुर्ण, तात्काळ प्रशासकीय मान्यता मिळणार.

The work of the four-lane highway will be completed | महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्गी

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्गी

Next

खामगाव (बुलडाणा): शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम त्यांनी मार्गी लागले आहे. या मार्गाच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या उच्च अधिकार्‍यांच्या चमूने शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी सर्वेक्षण केले.
शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग अँथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रोजेक्ट डायरेक्टर ब्राम्हणकर यांच्या चमूने आ. आकाश फुंडकर यांच्यासोबत टिळक पुतळा, नगर पालिका, महात्मा गांधी बगिचा, टॉवर चौक, तहसील, जलंब नाका, स्वामी सर्मथ संकुल, बटालियन, सुटाळा बु. ते मुख्य राष्ट्रीय महामार्गापर्यंंत पाहणी केली. त्यानं तर आमदार भाऊसाहेब फुंडकर यांच्याशी ब्राम्हणकर यांनी या कामाबद्दल विस्तृत चर्चा केली. सर्वेक्षण झाल्याने या चौपदरीकरणाच्या कामाला तात्काळ प्रशासकीय मान्यता मिळणार असून, लवकरच कामाला सुरवात होईल, अशी प्रतिक्रिया यावेळी आ. अँड. फुंडकर यांनी दिली.

Web Title: The work of the four-lane highway will be completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.