बुलडाण्यात होणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदर्भ साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 14:32 IST2017-11-15T14:28:58+5:302017-11-15T14:32:13+5:30

बुलडाणा : नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बुलडाणा शहरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदर्भ साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

Tukdoji Maharaj Vidarbha Sahitya Sammelan will be held in Buldhana | बुलडाण्यात होणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदर्भ साहित्य संमेलन

बुलडाण्यात होणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदर्भ साहित्य संमेलन

ठळक मुद्देसंमेलन पंकज लध्दड अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार २६ नोव्हेंबर ही तारिख निश्चित करण्यात आली आहे

बुलडाणा : नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बुलडाणा शहरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदर्भ साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
यासंदर्भात गर्दे वाचनालयांमध्ये भारतीय विचार मंचच्या वतीने सहविचार सभा नुकतीच घेण्यात आली. त्यामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदर्भ साहित्य संमेलन आयोजनासंदर्भात चर्चा करून त्याबाबत नियोजन करण्यात आले. हे संमेलन पंकज लध्दड अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे. २६ नोव्हेंबर ही तारिख त्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. या साहित्य संमेलनासाठी एक संयोजन समिती निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये  समितीचे संयोजक म्हणून रविंद्र लध्दड हे राहणार आहेत. सहसंयोजक म्हणून प्रवीण चिंचोळकर, मार्गदर्शक म्हणून प्रा. जय प्रकाश खोत आणि समितीचे इतर सदस्य म्हणून संतोषजी सांगली, अर्चनाताई देव, श्रीराम सोनुने, बाळ  अयाचित,  प्रा. ब्रिजेश लाहोटी, अमित कुलकर्णी, शाहीनाताई पठाण, अनंत उबाळे, वैभव लाड व अन्य व्यक्तींचा समावेश आहे. या संमेलनासाठी नोंदणी लवकरच सुरु होत आहे. साहित्य संमेलनात विविध अंगाने राष्ट्रसंत साहित्य, विविध साहित्य संदर्भात प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या साहित्य संमेलनाचा साहित्य प्रमी नागिरक व साहित्यीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संमेलनाचे संयोजक  रवींद्र  लद्धड यांनी केले आहे.

Web Title: Tukdoji Maharaj Vidarbha Sahitya Sammelan will be held in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.