राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम २३ ते २५ डिसेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:35 AM2017-11-15T01:35:24+5:302017-11-15T01:36:01+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने शहरात २३ ते २५ डिसेंबरपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ४९ वा पुण्यतिथी कार्यक्रम २३ ते २५ डिसेंबर रोजी स्वराज्य भवनाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.  

Rashtrasant Tukdoji Maharaj's death anniversary program from 23rd to 25th December | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम २३ ते २५ डिसेंबरला

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम २३ ते २५ डिसेंबरला

googlenewsNext
ठळक मुद्देरविवारी कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने शहरात २३ ते २५ डिसेंबरपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ४९ वा पुण्यतिथी कार्यक्रम २३ ते २५ डिसेंबर रोजी स्वराज्य भवनाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.  
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा कार्यक्रम होत असून, यामध्ये सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, युवक, महिला, भजन, कार्यकर्ता संमेलन तसेच व्याख्यान, राष्ट्रीय कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. हा त्रिदिवसीय सोहळा शिस्तबद्ध होण्याकरिता १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात गुरुदेव सेवा मंडळाची प्रचारक मंडळी मार्गदर्शन करणार आहे.
या त्रिदिवसीय वैचारिक मंथनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन  तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने बलदेवराव पाटील, रवींद्र मुंडगावकर, शेख गुरुजी, डॉ. त्र्यंबकराव आखरे, डॉ. गजानन काकड, अँड. संतोष भोरे, डॉ. प्रकाश मानकर, सहदेवराव खांबालकर, रवींद्र पाटील, अनिल हरणे, सुरेश राऊत, ज्ञानेश्‍वर साकारकर, शिवाजीराव म्हैसने, वसंत माळी, तुळशीराम चतरकार, डॉ. अजय उपाध्याय, पांडुरंग वाराणकर, नारायण मानकर व भास्कर वानखडे, डॉ. माने, सावळे गुरुजी, शुभम वरणकार, कुलदीप हरणे, ज्ञानेश्‍वर माळी आदींनी केले आहे.

Web Title: Rashtrasant Tukdoji Maharaj's death anniversary program from 23rd to 25th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.