शिक्षकांचा संप मिटवा : सिंदखेडराजात विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:40 AM2017-12-16T00:40:12+5:302017-12-16T00:40:32+5:30

विनाअनुदानित व मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्या पकांच्या मागण्या मान्य करून शासनाने संप मिटवावा, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे,  यासाठी तालुक्यातील स्वामी सर्मथ कमवि जांभोरा, राजीव गांधी कमवि सिंदखेडराजा,  जिजामाता कमवि सिं.राजा, वैभव कमवि जांभोरा व विजय मखमले कमवि म.पांग्रा शेकडो  विद्यार्थ्यांनी १५ डिसेंबरला सिंदखेडराजा येथे जिजामाता जन्मस्थानपासून तहसीलपर्यंत मूक  मोर्चा काढला. त्यानंतर तहसीलदार कणसे यांना निवेदन देण्यात आले.

Teachers' discontinuity: Silent Front of Students in Sindh Kheda | शिक्षकांचा संप मिटवा : सिंदखेडराजात विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा 

शिक्षकांचा संप मिटवा : सिंदखेडराजात विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा 

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन 

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : विनाअनुदानित व मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्या पकांच्या मागण्या मान्य करून शासनाने संप मिटवावा, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे,  यासाठी तालुक्यातील स्वामी सर्मथ कमवि जांभोरा, राजीव गांधी कमवि सिंदखेडराजा,  जिजामाता कमवि सिं.राजा, वैभव कमवि जांभोरा व विजय मखमले कमवि म.पांग्रा शेकडो  विद्यार्थ्यांनी १५ डिसेंबरला सिंदखेडराजा येथे जिजामाता जन्मस्थानपासून तहसीलपर्यंत मूक  मोर्चा काढला. त्यानंतर तहसीलदार कणसे यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलनामुळे राज्यातील  विनाअनुदानित कमवि सोमवारपासून बेमुदत संपावर आहेत. कनिष्ठ महाविद्यालयाच्या पात्र  याद्या अनुदानासह तत्काळ घोषित करा, उर्वरित कनिष्ठ महाविद्यालयांचे ऑफलाइन  मूल्यांकन करण्यात यावे, विनाअनुदानित तुकड्यांना तत्काळ अनुदान द्यावे, या व इतर  मागण्यांसाठी प्राध्यापकांचे बेमुदत शाळा बंद आंदोलन नागपूर येथील पटवर्धन मैदानावर  सुरू आहे. तेव्हापासून सदर कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान होत आहे. 
त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थी संघटनेने ‘शिक्षक वाचवा, विद्यार्थी घडवा, भवितव्य  वाचवा,’ शिक्षकांचा पगार चालू करा, याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अनुदानाचा प्रश्न  सोडवावा व कॉलेज सुरू करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक न्याय द्यावा, अशी मागणी  मोर्चादरम्यान  विद्यार्थ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सुरुवातीला  जिजामाता जन्मस्थानापासून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सदर मोर्चा तहसील  कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या  मोर्चादरम्यान सिंदखेडराजा पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक सिनाघंवाड, उ पनिरीक्षक सुनील खेडेकर व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Web Title: Teachers' discontinuity: Silent Front of Students in Sindh Kheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.