स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोताळ्य़ात रास्ता रोको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:33 AM2017-12-07T00:33:33+5:302017-12-07T00:35:46+5:30

मोताळा येथे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोताळा येथे बुधवारी एक तास रास्ता रोको केला. त्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रकरणी आंदोलनकर्त्र्यांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले.

Stop the way of self-respecting farmers' association! | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोताळ्य़ात रास्ता रोको!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोताळ्य़ात रास्ता रोको!

Next
ठळक मुद्देसोयाबीन, कापूस व धानाला हमी भाव मिळावाशेतकर्‍यांना त्वरित कर्जमुक्ती मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी केला रास्ता रोको

लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : सोयाबीन कापूस व धानाला हमी भाव मिळावा, शेतकर्‍यांची त्वरित कर्जमुक्ती व्हावी,  यासह विविध मागण्यांसाठी अकोला जिल्हा मुख्यालयात ठिय्या मांडून बसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी मोताळा येथे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोताळा येथे बुधवारी एक तास रास्ता रोको केला. त्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रकरणी आंदोलनकर्त्र्यांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले.
दुसरीकडे शेतकर्‍यांचे प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास आम्हाला भगतसिंगांचा मार्ग अवलंबवावा लागला, असा इशारा स्वाभिमानीचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा चंद्रशेखर चंदन यांनी दिला. अकोला येथील शेतकरी जागर मंचच्यावतीने ४ डिसेंबरपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी आंदोलन सुरू केले होते. त्याचाच एक भाग म्हणून मोताळा येथेही बुधवारी दुपारी हा रास्ता रोको करण्यात आला.  आंदोलनात श्याम अवथळे, शे.रफिक शे.करीम, प्रदीप शेळके, संतोष राजपूत, मुक्तार शेख, सै.वसीम, रशिद पटेल, महेंद्र जाधव, गंगाधर तायडे, नीलेश राजपूत, सदानंद पाटील, चंदू गवळी सहभागी होते.

Web Title: Stop the way of self-respecting farmers' association!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.