ठळक मुद्दे ९ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण वगार्चे आयोजन

बुलडाणा : जिल्ह्यात मुख्य निवडणूक अधिकाºयांच्या निदेर्शानुसार मतदार
याद्यांची विशेष मोहिम १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार
आहे. सामान्य नागरिकांनी  मतदार यादीत नाव कसे नोंदवावे याबाबत
कर्मचाºयांनी प्रशिक्षीत व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत
पुलकुंडवार यांनी दिल्या आहे.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात ९ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण वगार्चे आयोजन
करण्यात येते. या प्रशिक्षण वर्गामध्ये जिल्हाधिकारी मार्गदर्शन करताना
बोलत होते. यावेळी प्रशिक्षक म्हणून परभणी येथील उपजिल्हा निवडणूक
अधिकारी बिबे, औरंगाबाद येथील तांत्रिक कर्मचारी मोमीन आदी उपस्थित होते.
  यावेळी प्रशिक्षण वर्गाला प्रशिक्षकांनी संबोधीत केले. ते म्हणाले,
जिल्ह्यात १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत बीएलओ यांनी घरोघरी जावून
मतदारासंबधी व नव्याने समाविष्ठ होणारे मतदार यांची नमुना १ ते ८ ची
माहिती संकलित करावी. तसेच आॅनलाईन मोबाईल अ‍ॅप  अपलोड करावी. या
प्रशिक्षण वगार्ला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पर्यवेक्षक,
निवडणूक लिपीक, बीएलओ, डाटा एंन्ट्री आॅपरेटर उपस्थित होते. प्रशिक्षण
वर्गाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी केले.
प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी रविंद्र काकडे, शत्रुघ्न चव्हाण, विजय
सनिसे, अमोल वानखडे, विजय तायडे यांनी परिश्रम घेतले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.