कमी पिक कर्ज वितरण असलेल्या बँकांना मिळणार कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 03:23 PM2019-07-31T15:23:44+5:302019-07-31T15:23:54+5:30

कमी पिक कर्ज वितरण असलेल्या बँकांना जिल्हा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजवाव्यात, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) किशोर तिवारी यांनी दिले.

Show cause notice to banks with low crop loan disbursement | कमी पिक कर्ज वितरण असलेल्या बँकांना मिळणार कारणे दाखवा नोटीस

कमी पिक कर्ज वितरण असलेल्या बँकांना मिळणार कारणे दाखवा नोटीस

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कृषी क्षेत्रावर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी शेती कसण्यासाठी आर्थिक मदत पीक कर्जाच्या स्वरूपात झाली पाहिजे. बँकांनी पिक कर्ज देताना कुठलेही आढे-वेढे न घेता शेतकऱ्यांना पिक कर्ज द्यावे. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी दिलेला कर्जाचा सिबील स्कोर गृहीत धरू नये, कमी पिक कर्ज वितरण असलेल्या बँकांना जिल्हा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजवाव्यात, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) किशोर तिवारी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात पिक कर्ज वितरण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्षा उमाताई शिवचंद्र तायडे, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विनोद मेहेरे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक मोहन चांगदे, आरोग्य उपसंचालक डॉ. फारूकी, माजी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक उत्तम मनवर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.
भारतात हरीत क्रांती ही बँकांमुळे झाली असल्याचे सांगत तिवारी म्हणाले, बँका शेतकºयांच्या दारापर्यंत गेल्यामुळे शेतीला अर्थसहाय्य मिळाले. परिणामी, कृषी उत्पादन वाढून हरीत क्रांती झाली. अशाचप्रकारची हरीत क्रांती आता करायची आहे. बँकांनी प्रत्येक ब्रँचमध्ये पिक कर्ज वाटप सुरू असल्याचे फलक लावावे. पात्र असलेल्या शेतकºयांना वाढीव कर्ज द्यावे. त्यांच्याशी सौजन्याने वागावे. आपली नैतिक जबाबदारी ओळखून बँकांनी पिक कर्जाचे वितरण करावे. पिक कर्ज वितरणासाठी तालुकास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांनी नियमितपणे आढावा घेतला पाहिजे. प्रकरणनिहाय बँकाकडून निकाली काढून शेतकºयाला पिक कर्ज मिळून द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे बँकांनी त्यांच्याकडील शेतकरी खातेदारांचे ‘मल्टी बँकींग फायनान्स’ घेतलेल्या शेतकºयांच्या याद्या तयार कराव्यात. ते पुढे म्हणाले, क्षेत्रिय व्यवस्थापकांनी आपल्या बँक व्यवस्थापकांचा नियमित आढावा घेवून कमी वितरण असलेल्या शाखांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी बँक निहाय पीक कर्ज वितरण, पीक कर्जमाफीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला राष्ट्रीय कृत बँका, खाजगी व व्यापारी बँक, बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक, कृषि व सहकार विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


‘पीक कर्जासाठी कागदपत्रांची मागणी करू नये’
पिक कर्ज हे नजर गहाणचा विषय असल्यामुळे कागदपत्रांची मागणी करू नये. अनेक बँका पीक कर्जासाठी अन्य बँकांचे ना हरकत प्रमाणपत्र मागतात. ते मागण्याची आवश्यकता नाही. विविध बँकांनी शेतकºयांसाठी पिक कर्जामध्ये हेअर कटची सुविधा दिली आहे. शेतकºयांना याचा लाभ देण्यात यावा. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या २३ हजार पात्र शेतकरी खातेदारांना वर्ग करण्यात आलेल्या याद्यांप्रमाणे पिक कर्ज वितरणाचा लाभ देण्यात यावा, अशा सुचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) किशोर तिवारी यांनी दिल्या.

Web Title: Show cause notice to banks with low crop loan disbursement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.