शिवसेनेचे जिल्हाभर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:50 AM2017-10-24T00:50:40+5:302017-10-24T00:51:13+5:30

बुलडाणा:  शेतकर्‍यांच्या घरात आलेला माल शासकीय  हमीभावपेक्षा कमी दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे शे तकरी वर्ग अडचणीत सापडला असून, ही एक प्रकारची शे तकर्‍यांची लूट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे  कमी दराने शेतीमाल खरेदी करणार्‍यांवर फौजदारी दाखल  करावी, तसेच तत्काळ जिल्ह्यात हमी भाव खरेदी केंद्रे सुरू  करावी अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा  देऊन जिल्हाभर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २३ ऑ क्टोबर रोजी ठिय्या आंदोलन केले.

Shiv Sena's district-level stir | शिवसेनेचे जिल्हाभर ठिय्या आंदोलन

शिवसेनेचे जिल्हाभर ठिय्या आंदोलन

Next
ठळक मुद्देहमीभावाने शेतीमाल खरेदी न करणार्‍यांवर फौजदारी दाखल  करा - मागणीहमीभाव खरेदी केंद्र सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा:  शेतकर्‍यांच्या घरात आलेला माल शासकीय  हमीभावपेक्षा कमी दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे शे तकरी वर्ग अडचणीत सापडला असून, ही एक प्रकारची शे तकर्‍यांची लूट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे  कमी दराने शेतीमाल खरेदी करणार्‍यांवर फौजदारी दाखल  करावी, तसेच तत्काळ जिल्ह्यात हमी भाव खरेदी केंद्रे सुरू  करावी अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा  देऊन जिल्हाभर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २३ ऑ क्टोबर रोजी ठिय्या आंदोलन केले.
बुलडाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन  करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर  बुधवत, संजय गायकवाड आदींच्या नेतृत्वात शिवसेना  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन हमी भाव खरेदी केंद्र  सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. मोताळा येथे  संजय गायकवाड, भोजराज पाटील यांच्या नेतृत्वात  तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.  तर मेहकर येथे शे तकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी खा. प्रतापराव जाधव यांच्या ने तृत्वात २३ ऑक्टोबर रोजी जनसंपर्क कार्यालयापासून उ पविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.  यावेळी शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय  अधिकारी डॉ. नीलेश अपार व तहसीलदार संतोष काकडे यांना  देण्यात आले.  सिंदखेड राजा येथे शेतकर्‍यांची आर्थिक  िपळवणूक थांबवावी, अन्यथा शिवसेना स्टाइलने तीव्र आंदोलन  करण्याचा इशारा आ.डॉ. शशिकांत खेडेकर दिला. तर खुल्या  बाजारात मूग, उडीद व सोयाबीनची अतिशय कमी भावाने  खरेदी सुरू आहे. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्यामुळे  तत्काळ शेतमालाची शासनामार्फत खरेदी करण्यात यावी, अशी  मागणी करत शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थित शिवसेना तालुका  प्रमुख बळीराम मापारी यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.   घाटाखालील संग्रामपूर येथे  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शांताराम  दाणे व रवी पाटील झाडोकार यांच्या नेतृत्वात  तहसील  कार्यालयावर डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. तर शे तमालाची योग्य दराने शासकीय केंद्रावर खरेदी व्हावी या  मागणीकरिता शिवसेनेच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख विजय  साठे यांच्या नेतृत्वात २३ ऑक्टोबर रोजी मलकापूर उपविभागीय  अधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर करण्यात  आले. तसेच नांदुरा व खामगाव येथेही तहसीलदार यांना निवेदन  देऊन  शासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा  इशारा देण्यात आला.  

Web Title: Shiv Sena's district-level stir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.