बुलडाणा जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार व्यक्तींची मौखिक आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 05:07 PM2018-01-05T17:07:48+5:302018-01-05T17:12:59+5:30

बुलडाणा :आरोग्य विभागामार्फत १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली असून या कालावधीत जिल्ह्यातील ३० वर्षावरील ३ लाख ६५ हजार ३९६ व्यक्तींची विशेष तपासणी करण्यात आली.

Oral health check-up of 3,65,000 people in Buldhana district | बुलडाणा जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार व्यक्तींची मौखिक आरोग्य तपासणी

बुलडाणा जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार व्यक्तींची मौखिक आरोग्य तपासणी

Next
ठळक मुद्देशहरी भागात १ ते ३१ डिसेंबर दरम्यान मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली.५२ प्राथमिक आरोग्य केंद्र, १४ ग्रामीण रूग्णालय, ३ दवाखाने, ३ उपजिल्हा रूग्णालय व १ जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फत सेवा देण्यात आली.शहरी भागातील एकूण ४१ हजार ८६६, ग्रामीण भागातील ३ लाख २३ हजार ५३० व्यक्तींची तपासणी करण्यात आली

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : मुख स्वास्थ हे सर्व शारिराच्या स्वास्थाचे गणक आहे. त्याचप्रमाणे स्वास्थ जर व्यवस्थित ठेवले तर पुढील अनेक आजारापासून आपण वाचू शकतो. यासाठी आरोग्य विभागामार्फत १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली असून या कालावधीत जिल्ह्यातील ३० वर्षावरील ३ लाख ६५ हजार ३९६ व्यक्तींची विशेष तपासणी करण्यात आली.
जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत ग्रामीण भागात व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फत शहरी भागात १ ते ३१ डिसेंबर दरम्यान मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी मौखिक आरोग्य तपासणी सोबत मौखिक आरोग्य कसे राखावे, कर्करोगास प्रतिबंध, तंबाखूचे दुष्परिणाम व लवकर निदानासाठी तपासणी करण्याबाबत लोकांना माहिती देण्यात आली. या मोहिमेदरम्यान ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्ह्यातील एकूण ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र, १४ ग्रामीण रूग्णालय तसेच शहरी भागातील नागरिकांसाठी नगरपालिकेअंतर्गंत येणाºया ३ दवाखाने, ३ उपजिल्हा रूग्णालय व १ जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फत मौखिक आरोग्याबाबत सेवा देण्यात आली.
या मोहिमेदरम्यान डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ ते ९ डिसेंबर दरम्यान ५५ हजार ३०८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली, दुसºया आठवड्यात १० ते १६ डिसेंबर दरम्यान १ लाख २२ हजार ९३, तिसºया आठवड्यात १७ ते २३ डिसेंबर दरम्यान ९३ हजार ४०२ व चवथ्या आठवड्यात २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान ९४ हजार ५९३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. अशा प्रकारे शहरी भागातील एकूण ४१ हजार ८६६, ग्रामीण भागातील ३ लाख २३ हजार ५३० व्यक्तींची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली असून ग्रामीण भागात मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.


याबाबत करण्यात आली तपासणी
जिल्ह्यात १ ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या मौखिक आरोग्य तपासणी दरम्यान तोंडात काही त्रास असल्यास, दात दुखणे, तोंडात १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस जखम, व्रण, गाठ असल्यास, अन्न व पाणी गिळतांना त्रास होणे. तोंड उघडता न येणे, कोणत्याही प्रकारचे तंबाखूचे सेवन करीत असल्यास ३१ वर्षावरील व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

 

Web Title: Oral health check-up of 3,65,000 people in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.