Maratha Kranti Morcha : शेगाव शहरात कडकडीत बंद, ठिकठिकाणी रास्तारोको, टायर जाळून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 10:34 AM2018-07-24T10:34:45+5:302018-07-24T10:35:19+5:30

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शेगावात रास्तारोको करण्यात आला.

Maratha Kranti Morcha : Rasta roko protest at Shegaon city | Maratha Kranti Morcha : शेगाव शहरात कडकडीत बंद, ठिकठिकाणी रास्तारोको, टायर जाळून निषेध

Maratha Kranti Morcha : शेगाव शहरात कडकडीत बंद, ठिकठिकाणी रास्तारोको, टायर जाळून निषेध

Next

शेगाव - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शेगावात रास्तारोको करण्यात आला. शहरात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शेगाव येथील शिवाजी चौकात सकल मराठा समाज बांधव एकत्रित येऊन महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाले आहेत.

यावेळी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसंच ''मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. जय भवानी, जय शिवराय''अशी घोषणाबाजीही करण्यात आली आहे.  

Web Title: Maratha Kranti Morcha : Rasta roko protest at Shegaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.