बुलडाण्यात साडेसात लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:20 AM2018-04-09T01:20:00+5:302018-04-09T01:20:00+5:30

बुलडाणा: जिल्ह्यात यंदा ७ लाख ३२ हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून, धूळ पेरणीत शेतक-यांनी कपाशीची लागवड करू नये. कापसावर बोंडअळी पडण्यास धूळ पेरणी ही मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत असल्याचे पीकेव्हीच्या शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे शेतक-यांनी धूळ पेरणी टाळावी, असा सूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या खरीपपूर्व हंगाम आढावा बैठकीत निघाला.

Khulna sowing seeds in Buldhana, 150,000 hectares! | बुलडाण्यात साडेसात लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा!

बुलडाण्यात साडेसात लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा!

Next
ठळक मुद्देखरीप हंगामपूर्व बैठक बोंडअळी नियंत्रणासाठी बियाण्यासोबत देणार फेरोमेन सापळे - फुंडकर

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात यंदा ७ लाख ३२ हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून, धूळ पेरणीत शेतक-यांनी कपाशीची लागवड करू नये. कापसावर बोंडअळी पडण्यास धूळ पेरणी ही मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत असल्याचे पीकेव्हीच्या शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे शेतक-यांनी धूळ पेरणी टाळावी, असा सूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या खरीपपूर्व हंगाम आढावा बैठकीत निघाला.
दरम्यान, बोंडअळीच्या संकटापासून शेतक-यांना आगामी काळात वाचविण्यासाठी या मुद्द्यावर जागृतीकरून कंपन्याच्या बियाण्याच्या पाकिटासोबतच फेरोमेन सापळे देण्याची सक्ती करण्यात आली असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी खरिपातील पावसाच्या लहरीपणामुळे शेती संकटात आली होती. बोंडअळीने शेतकºयांना मोठा फटका दिला होता. त्या पृष्ठभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीस खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे, आ. हर्षवर्धन सपकाळ, अ‍ॅड. आकाश फुंडकर,  जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. नेमाने, विभागीय सहसंचालक नागरे प्रामुख्याने उपस्थित होते. 
दरम्यान, आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ७ लाख ३२ हजार हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने पेरणीसाठी प्रस्तावित असलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांच्या १ लाख ५५ हजार १३२ क्विंटल बियाणे पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. कापूस पिकाच्या बीटी कापूस बीजी-२ या वाणाची जिल्ह्यासाठी ८ लाख ११ हजार ५०० पाकिटांची मागणी करण्यात आली असून, रासायनिक खतांचे जिल्ह्यासाठी मंजूर आवंटन हे १ लाख ३७ हजार ६६० मेट्रिक टन असून, सध्या जिल्ह्यात २० हजार ७९२ मेट्रिक टन साठा उपलब्ध असल्याची माहिती या खरीप आढावा बैठकीत देण्यात आली.
दुसरीकडे  बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतक-यांमध्ये जनजागृती करण्यासाठी ग्रामस्तरावर सभा घेण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. 
शेतक-यांना कमी कालावधीत येणा-या कापूस बियाण्यांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यासोबतच बोगस बियाणे, खत व कीटकनाशकांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची तक्रार आल्यास शेतक-यांना मदत करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्यात यावी, असेही कृषिमंत्र्यांनी यंत्रणेला निर्देश दिले. खरीप हंगामात कुठल्याही  प्रकारच्या बियाणे, खताची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी यंत्रणेने सतर्क राहावे. पेरणीपूर्वी पीक कर्ज मिळावे, पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी योग्य मनुष्यबळ व यंत्रणा उभी करावी उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत पूर्वसंमती घेऊन साहित्य घेतलेल्या शेतक-यांच्या खात्यावर अनुदााची रक्कम अदा करण्यात येत असून, शेतक-यांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आवाहन केले.
महावितरणने त्यांच्याकडील मान्सूनपूर्व वीज यंत्रणेची कामे त्वरित पूर्ण करण्याबाबतही पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. पेड पेडिंग वीज जोडण्या गतीने पूर्ण करण्यात याव्यात. रोहित्र जळालेले असल्यास त्वरित रोहित्र बदलून देण्यात यावे, जेणेकरून शेतक-यांना नाहक त्रास होणार नाही. सोबतच तूर खरेदीसाठी आवश्यक असलेल्या गोदामांची व्यवस्था उभारण्याबाबत सूचित करून गोदामांचा अंदाज घेऊन तूर खरेदी करावी, असे ते म्हणाले. खा. प्रतापराव जाधव यांनीही बोगस बियाणे जिल्ह्यात येणार नाही, याची दक्षता बाळगावी, असे सूचित केले.
बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले. उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी शेवटी आभार मानले. 
 
गेल्यावर्षी ३३ टक्केच पीक कर्जाचे वाटप!
 जिल्ह्यात गेल्या वर्षी अवघे ३३ टक्केच पीक कर्ज वाटप केल्या गेले. शेतकरी कर्जमाफीसह अन्य कारणांनी हे उद्दिष्ट पूर्णत्वास गेले नाही. यावर्षी पीक कर्जाचे उद्दिष्ट १ हजार ८७७ कोटी रुपयांचे असून, खरिपाचे उद्दिष्ट हे १ हजार ७४५ कोटी रुपयांचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी खरीप पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची काळजी बँकांनी व यंत्रणेने घ्यावी. बँकांसमोर पीक कर्जासाठी शेतकºयांच्या रांगा लागणार नाही याची काळजी प्रामुख्याने घेतली जावी, अशी भूमिका खा. प्रतापराव जाधव यांनी या बैठकीत मांडली. पीक कर्ज आणि महावितरणच्या कार्यपद्धतीसंदर्भात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षी अवघे ३३ टक्केच पीक कर्ज वाटप झालेले आहे, हा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला.

गुरांसाठी सोयाबीन कुटार घातक!
 उन्हाळ््याची दाहकात जाणवत असताना सध्या चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे कुटार त्यामुळे गुरांना खाऊ घालण्याकडे शेतकºयांचा कल असतो; परंतु या कुटारात अ‍ॅन्टी आॅक्साइड तयार होते. त्यामुळे गुरांच्या शरीरात कॅल्सियमची कमी निर्माण होऊन गुरे भाकड होण्याचा धोका असतो. मुळात बुलडाणा जिल्ह्यातील मातीमध्ये कॅल्सियम डिफिसीएनस्सी आहे. याबाबतही शेतक-यांमध्ये जागृती करून चारा टंचाई निर्माण झालेल्या भागात यंत्रणेने चांगला चारा पुरवावा, हा मुद्दा आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी रेटून धरला. त्या दृष्टीनेही यंत्रणेला काळजी घेण्याच्या सूचना या आढावा बैठकीत देण्यात आल्या आहेत.

Web Title: Khulna sowing seeds in Buldhana, 150,000 hectares!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.