नव्या फळबागांना विमा योजना लागू; जुन्याची मात्र प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 02:21 PM2019-06-05T14:21:11+5:302019-06-05T14:21:35+5:30

बुलडाणा: शासनाने नवीन फळबागांसाठी विमा योजना लागू केली आहे. मात्र प्रत्यक्षात पूर्वीच्या फळबागांचे नुकसान होऊनही अद्याप त्याची मदत देण्यात आली नाही

Insurance plan for new horticulture; The old waiting only | नव्या फळबागांना विमा योजना लागू; जुन्याची मात्र प्रतीक्षाच

नव्या फळबागांना विमा योजना लागू; जुन्याची मात्र प्रतीक्षाच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शासनाने नवीन फळबागांसाठी विमा योजना लागू केली आहे. मात्र प्रत्यक्षात पूर्वीच्या फळबागांचे नुकसान होऊनही अद्याप त्याची मदत देण्यात आली नाही. गतवर्षी केळी फळबागेसह इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते; मात्र त्याच्या विम्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजनेतंर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना २०१९-२० करीता जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतील विम्याचा लाभ मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू, लिंबू व चिकु या सहा फळपिकांसाठी मिळणार आहे. बँकेकडून अधिसूचित फळ पिकांसाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेल्या शेतकऱ्यांना तसेच बिगर कर्जदार शेतकºयांनी विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची मुदत फळपिकनिहाय देण्यात आलेली आहे. बिगर कर्जदार शेतकºयांनी विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची अंतिम मुदत संत्रा, पेरू, लिंबू, या फळ पिकांकरीता १४ जून, चिकु व मोसंबी फळपिकासाठी १ जुलै तर डाळींब पिकाकरीता १५ जुलै आहे. फळपीक निहाय निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यावर नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र मागीलवर्षी दुष्काळाचा फटका बसलेल्या व नुकसान झालेल्या फळ पिकांचा विमा अद्यापही शेतकºयांना मिळाला नाही. त्यामुळे नवीन फबागेचा नवीन विमा काढावा की नाही, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
बोरखेड, पलढग येथे झाले होते नुकसान
बुलडाणा तालुक्यातील बोरखेड व पलढग येथे काही शेतकºयांनी खरीप हंगामामध्ये केळी पिकाची लागवड केली होती. परंतू हिवाळ्यात डिसेंबर २०१८ व जानेवारी २०१९ मध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे केळीचे पिक करपून नष्ट झाले होते. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परंतू अद्यापही पिक विम्याचा लाभ मिळाला नाही.
विम्याचा लाभ देण्याची मागणी
४नुकसान झालेल्या फळबागांचा पिक विमा मंजूर करून देण्यात यावा, अन्यथा बँकेचे पिक कर्ज भरता येणार नाही व नवीन पिक कर्ज बँक देणार नाही, पुढील हंगामामध्ये कर्ज न मिळाल्यामळे शेतीची पेरणी करता येणार नाही, असे अनेक प्रश्न शेतकरी विठ्ठल गवळी, सुधाकर गवळी, दयाराम पायगव्हाण, अशोक खांडेभराड, आशा खांडेभराड यांनी जिल्हाधिकाºयांकडे उपस्थित केले आहेत.

Web Title: Insurance plan for new horticulture; The old waiting only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.