लोकमतचा दणका: बोगस ‘ट्रान्सपोर्ट पास’ देयक प्रकरणी चौकशीस प्रारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 04:26 PM2018-08-03T16:26:28+5:302018-08-03T16:30:00+5:30

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतुकीच्या १३९ ‘ट्रान्सपोर्ट पास’ देयक घोळ प्रकरणी विभागीय आयुक्तांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली

Inquiry in bogus 'Transport Pass' Payment Case | लोकमतचा दणका: बोगस ‘ट्रान्सपोर्ट पास’ देयक प्रकरणी चौकशीस प्रारंभ 

लोकमतचा दणका: बोगस ‘ट्रान्सपोर्ट पास’ देयक प्रकरणी चौकशीस प्रारंभ 

Next
ठळक मुद्देया समितीचे अध्यक्ष म्हणून वाशिमचे निवासी उपजिल्हाधिकारी काम पाहत आहेत.जिल्हा पुरवठा विभागातील बोगस वाहतूक पास देयक घोळ सर्वप्रथम ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता.

 

- अनिल गवई

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतुकीच्या १३९ ‘ट्रान्सपोर्ट पास’ देयक घोळ प्रकरणी विभागीय आयुक्तांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली. या समितीचे अध्यक्ष म्हणून वाशिमचे निवासी उपजिल्हाधिकारी काम पाहत असून, शुक्रवारी या समितीने प्रत्यक्ष चौकशीस प्रारंभ केला आहे. या चौकशीमुळे जिल्हा पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली असून, जिल्हा पुरवठा विभागातील बोगस वाहतूक पास देयक घोळ सर्वप्रथम ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. हे विशेष!

धान्य वाहतुकीचा ट्रक कोठे  (गंतव्य स्थान) पोचल्याबाबत आणि धान्य वाहतुकीचे देयक अदा करण्यात महत्वपूर्ण भूमिका असलेल्या १३९ ट्रान्सपोर्ट पास कंत्राटदाराकडून गहाळ झाल्या. त्याअनुषंगाने वाहतूक कंत्राटदाराने उपरोक्त १३९ वाहतूक पासचे देयक यापूर्वी न काढल्याबाबतचे स्टॅम्प पेपरवर नोटरी करून जिल्हा पुरवठा विभागात सादर केले. या आधारे १३९ वाहतूक पासच्या देयकांसाठी ५९ लक्ष ७२ हजार १७७ रुपयांची मागणी केली. दरम्यान, उपरोक्त नस्तीबाबत संशय बळावल्याने जिल्हाधिकाºयांनी अप्पर जिल्हाधिकाºयामार्फत नस्तीची तपासणी करण्याचे निर्देश दिले. अप्पर जिल्हाधिकाºयांकडून करण्यात आलेल्या तपासणीत पुन्हा ७ ट्रान्सपोर्ट पासवर गंतव्यस्थानाची अफरातफर आढळून आली. त्यामुळे या ७ पास वगळून पुन्हा ९९ पासचे देयक मंजूर करण्याची नस्ती पुरवठा विभागाद्वारे सादर करण्यात आली. या नस्तीच्या तपासणी अंती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या यापैकी ४ पासचे देयक आधीच अदा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुन्हा ही नस्ती देयक मंजूर न करता परत कण्यात ंआली. दरम्यान, १६ जुलै २०१८ रोजी तिसºयांदा १३९ ट्रान्सपोर्ट पासेसची संख्या चक्क ९५ होवून या पासच्या देयक मंजुरीसाठी नस्ती जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आली आहे. अर्थातच चौथ्या तपासणी अखेर केवळ ९५ ट्रान्सपोर्ट पासच्या देयकाची रक्कम शिल्लक राहल्याचे उघड झाले. 


लोकमत वृत्ताची विभागीय आयुक्तांकडून दखल!

बुलडाणा जिल्हा पुरवठा विभागातील बोगस वाहतूक पास देयक प्रकरण ‘लोकमत’ने २५ जुलै रोजी उघडकीस आणले. त्यानंतर या वृत्ताची गंभीर दखल घेत, विभागीय आयुक्त पियुष सिंह वाशिमचे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेष हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती गठीत केली.


समितीकडून तात्काळ चौकशी!

 ‘वाहतूक पास’ बोगस देयकप्रकरणी चौकशीचे आदेश प्राप्त होताच, या चौकशी समितीचे अध्यक्ष शैलेष हिंगे समिती सदस्यांसह जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे  दाखल झाले. अध्यक्षांसह आणखी तीन वरिष्ठ अधिकाºयांचा या समितीमध्ये समावेश असल्याचे समजते. बोगस देयक प्रकरणासोबतच जिल्हा पुरवठा विभागातील इतर गंभीर बाबींचीही चौकशी या समिती मार्फत केली जाणार असल्याने, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कमालिचे धास्तावले असल्याची माहिती समोर आली. 

Web Title: Inquiry in bogus 'Transport Pass' Payment Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.