आयडॉल स्पध्रेत औरंगाबादचा मुनावर अली ठरला महाविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 12:20 AM2017-09-06T00:20:21+5:302017-09-06T00:20:47+5:30

शहरी व ग्रामीण भागातील होतकरू कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना कला सादर करण्यासाठी संधी देण्याबरोबरच सतत नावीन्य स्वीकारण्याचा अनोखा संगम साधणार्‍या बुलडाणा अर्बन परिवाराच्या कर्मचारी गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या बुलडाणा आयडॉल स्पध्रेच्या अंतिम सोहळ्यात औरंगाबादच्या मुनावर अली याने महाविजेता होण्याचा मान मिळविला.

The great winner of Aurangabad, the grand successor of Idol | आयडॉल स्पध्रेत औरंगाबादचा मुनावर अली ठरला महाविजेता

आयडॉल स्पध्रेत औरंगाबादचा मुनावर अली ठरला महाविजेता

Next
ठळक मुद्देबुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचा उपक्रमहोतकरू कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ ११,१११ रुपयांचा धनादेश देऊन मुनावरला गौरविण्यात आले





लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहरी व ग्रामीण भागातील होतकरू कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना कला सादर करण्यासाठी संधी देण्याबरोबरच सतत नावीन्य स्वीकारण्याचा अनोखा संगम साधणार्‍या बुलडाणा अर्बन परिवाराच्या कर्मचारी गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या बुलडाणा आयडॉल स्पध्रेच्या अंतिम सोहळ्यात औरंगाबादच्या मुनावर अली याने महाविजेता होण्याचा मान मिळविला.
शहरी व ग्रामीण कलारसिकांच्या साक्षीने आणि प्रेक्षकांनी खचून भरलेल्या गर्दे वाचनालयाच्या सभागृहात सोमवारी रात्री बुलडाणा आयडॉल स्पध्रेच्या महाअंतिम (ग्रॅण्डफिनाले) सोहळ्याची अत्यंत जल्लोषात व उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. आयडॉल स्पध्रेमध्ये औरंगाबादच्या मुनावर अली याने स्पध्रेच्या तीनही फेरीत उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम बाजी मारून महाविजेते पदाचा किताब मिळविला. यावेळी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, संस्थेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर, उपाध्यक्ष राजेश देशलहरा, अँड.जितेंद्र कोठारी,  राजेंद्र काळे यांच्या हस्ते मुनावर अलीला ११ हजार १११ रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पध्रेत किशोर राजपूत यास द्वितीय, तर o्रद्धा वानखेडे व शिवदास साठे यांना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले. या स्पध्रेत किशोर दिवटे, दीपक राऊत, श्याम शिंदे, भाग्यo्री इंगळे, एस.एस. नृपनारायण, अनिल माकोडे, रोशनी गेडाम, तेजस नाईक, मुकुंद सूर्यवंशी, कविता वरघट, भगवान बाभूळकर यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. 
प्रारंभी भारतमाता पूजन व दीपप्रज्वलनानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, संस्थेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर यांच्या हस्ते महाअंतिम सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेश देशलहरा, परीक्षक उमेश अंजनकर, गजानन सोनवणे, सिफनी ग्रुपचे सचिन मुंढे उपस्थित होते. नरेंद्रसिंग राजपूत व चंद्रशेखर जोशी यांनी संचालन केले. यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्ष कोमल झंवर, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर, अनंताभाऊ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गजानन चवरे, उपाध्यक्ष प्रीती कोलारकर, सचिव संजय कुळकर्णी, मंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य व संस्थेच्या कर्मचार्‍यांनी परिo्रम घेतले. 

Web Title: The great winner of Aurangabad, the grand successor of Idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.