कृषी पंपासाठी दिवसा विज द्या, अन्यथा हिवाळी अधिवेशनात आंदोलन -नानाजी आखरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 03:05 PM2018-10-01T15:05:56+5:302018-10-01T15:07:47+5:30

शासनाने कृषिपंपास सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत म्हणजेच दिवसा वीजपुरवठा द्यावा अन्यथा आगामी हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्याचा  इशारा भारतीय किसान संघाचे  प्रांताध्यक्ष नानाजी आखरे यांनी येथे दिला. 

Give electricity to agriculture pumps, otherwise the movement in the winter session - Nanaaji aakhare | कृषी पंपासाठी दिवसा विज द्या, अन्यथा हिवाळी अधिवेशनात आंदोलन -नानाजी आखरे 

कृषी पंपासाठी दिवसा विज द्या, अन्यथा हिवाळी अधिवेशनात आंदोलन -नानाजी आखरे 

Next

लोकमत न्युज नेटवर्क
शेगाव - रात्री पिकांना पाणी देणे त्रासाचे तसेच वन्यप्राण्यामुळे असुरक्षिततेचे आहे. यामध्ये शेतकºयाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी शासनाने कृषिपंपास सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत म्हणजेच दिवसा वीजपुरवठा द्यावा अन्यथा आगामी हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्याचा  इशारा भारतीय किसान संघाचे  प्रांताध्यक्ष नानाजी आखरे यांनी येथे दिला. 
शेगाव येथील अग्रसेन भवन मध्ये आयोजित भारतीय किसान संघाच्या  विदर्भ प्रांतीय त्रैवार्षिक अधिवेशनाच्या समारोपानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय संघटन मंत्री दिनेश कुळकर्णी, प्रांत महामंत्री बाबुराव देशमुख, सुभाष लोहे, दादा लाड, रमेश मंडाळे, बबनदादा भुतडा, कृष्णलाल रावलानी, प्रल्हाद काळे, आनंदराव घनोकार यांची उपस्थिती होती.  शासनाच्या कृषी विभागाने कामाची गती वाढवावी  ‘शेत तिथे रस्ता’ करण्यासाठी  तहसीलदारांनी प्रभावी अंमलबजावणी करावी. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू होणाºया शेतकरी कुटूंबातील व्यक्तीला शासकीय मदत देण्यासाठी शासनाने सातबाराधारक शेतकरी  नव्हे  तर त्या शेतकºयांचे संयुक्त कुटूंब घटक मानले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. 
सेंद्रिय शेतीसाठी जनावरे असणे महत्वाचे आहे.सेंद्रिय शेतीसाठी गोशाळेला  अनुदान द्यावे यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाणी समस्या निर्माण होणार आहे त्यामुळे जनावरांसाठी शासनाने एप्रिल, मे, जून या तीन महिन्यासाठी प्रत्येक तालुक्यात ४ छावण्या सुरू कराव्या. गायीची अवैध कत्तल रोखण्यासाठी गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करून कायदा कठोर करावा. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने कोरडवाहू शेती करणारा शेतकरी मेटाकुटीस आला आहे.याकरता सरकारने सिंचन प्रकल्पाला गती देऊन विदभार्तील शेतजमीन सिंचनाखाली आणावी. जिगाव प्रकल्पात बुडीत संपादित झालेल्या जमीन संदभार्तील खरेदी विक्री चे निर्बंध शिथिल करावे अशी मागणी सुद्धा भारतीय किसान संघाचे प्रांताध्यक्ष नानाजी आखरे यांनी केली आहे. 

शेतजमिनीचे कुंपनासाठी १०० टक्के अनुदान द्या
वन्य प्राण्यांपासून शेतीपिकांचे संरक्षण व्हावे याकरता शासनाने शेताला कुंपण घालून द्यावे किंवा शेतकºयांना कुंपणासाठी शेत १०० टक्के अनुदान देण्याची अनुदान द्यावे अशी आग्रही मागणी भारतीय किसान संघाने मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे प्रांताध्यक्ष नानाजी अखेर यानी  सांगितले.

भारतीय किसान  संघ विदर्भ प्रांताची नुतन कार्यकारिणी घोषित
भारतीय किसान संघाची विदर्भ प्रांत कार्यकारिणी घोषीत करण्यात आली. यामध्ये प्रांताध्यक्ष नाानाजी आखरे  नागपूर, महामंत्री बी ए देशमुख  शेगाव, उपाध्यक्ष किरण बरवे गडचिरोली, सुभाष  देशमुख धामणगाव रेल्वे, मुगुटराव भिसे उमरा (भिसे)  खामगाव,सहमंत्री बाबाराव कपिले, कोषाध्यक्ष रामभाऊ गायकवाड यवतमाळ, जैविक शेती प्रमुख मधुकर सरप अकोला, सह जैविक शेती प्रमुख सुरेश श्रीराव मोर्शी, महिला प्रमुख लताताई पोहेकर निंबी मोर्शी , अ‍ॅग्रो एकानॉमिक रिसर्च सेंटर  प्रमुख बी आर पाटील चिखली, संघटनमंत्री रमेश मंडाळे नागपूर , सदस्यांमध्ये पांडुरंग गायकी कडोसी ता बाळापूर, पुंडलिक लांडगे वर्धा , संजय डेहनकर दारव्हा ,माधवराव कापगते लाखनी भंडारा आदींचा समावेश आहे.

Web Title: Give electricity to agriculture pumps, otherwise the movement in the winter session - Nanaaji aakhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.