गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे भीमसैनिकांनी घेतले दर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:41 AM2017-12-07T00:41:39+5:302017-12-07T00:42:29+5:30

बुलडाणा :  तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशाची ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी शहरातून हजारो भीमसैनिकांनी एकत्र येऊन  मिरवणूक काढली. 

Gautam Buddha's Asthma is taken by the Ghiamyanakis | गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे भीमसैनिकांनी घेतले दर्शन 

गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे भीमसैनिकांनी घेतले दर्शन 

Next
ठळक मुद्देमहापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेबांना बुलडाण्यात अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशाची ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी शहरातून हजारो भीमसैनिकांनी एकत्र येऊन  मिरवणूक काढली.  गांधी भवन येथून शहरातील मुख्य मार्गाने बुद्धम् शरणम् गच्छामीचा गजर करीत स्थानिक भीमनगर बुद्धविहार येथे दिवसभर धम्म बांबवांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
 त्यानंतर सायंकाळी ४ वाजता अस्थिकलश मिरवणुकीला बौद्ध भिक्कू, बौद्धाचार्य, भदंत महाथेरो यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. 
 या अस्थिकलश मिरवणुकीत भदंत कारूणीको महाथेरो (संकल्प बुद्ध विहार नागपूर) तसेच समतेचे निळे वादळ संघटनेचे भाई अशांत वानखेडे, राष्ट्रवादीचे संतोष रायपुरे,  माजी नगरसेवक दादाराव गायकवाड, लताबाई पैठणकर, अशोक इंगळे, वा. का. दाभाडे, तायडे, बोर्डे, गवई, खरात, शिरसाट, साबळे, साळवे, मोरे, राऊत, वानखेडे, वाकोडे, सुरडकर, काळे, हिवाळे, जाधव यांसह हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते. बुलडाणा अर्बनसमोर डॉ. सुकेश झंवर व संचालकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले.  मलकापूर रोडवरील धम्मगिरी बौद्ध विहार येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येऊन धम्म वंदना घेण्यात आली. पंचक्रोशीतील शेकडो धम्मसेवकांनी बौद्ध मूर्तीचे दर्शन घेतले. 

Web Title: Gautam Buddha's Asthma is taken by the Ghiamyanakis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.