अमडापूर येथे दीड लाखांचा गुटखा जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:43 AM2017-09-22T00:43:57+5:302017-09-22T00:43:57+5:30

अमडापूर : २0 सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता नव्याने रुजू झालेले ठाणेदार विक्रांत पाटील यांनी गुटखा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुधन सुसर संजय नागवे, सय्यद मुसा, दीपक चव्हाण यांनी अमडापूर पेट्रोल पंपासमोर पाळत ठेवून आरोपी सय्यद अजहर सै.अकबर याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून इंडिगो गाडी क्र. एम. एच.२0 बी.सी.५0७५ या कारसह सहा कट्टे गुटखा पकडला. सदर गुटख्याची किंमत ४८६00 रुपये आहे.

Gadda of 1.5 lakhs seized in Amadapur | अमडापूर येथे दीड लाखांचा गुटखा जप्त 

अमडापूर येथे दीड लाखांचा गुटखा जप्त 

Next
ठळक मुद्देपोलिसांची दुसरी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : २0 सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता नव्याने रुजू झालेले ठाणेदार विक्रांत पाटील यांनी गुटखा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुधन सुसर संजय नागवे, सय्यद मुसा, दीपक चव्हाण यांनी अमडापूर पेट्रोल पंपासमोर पाळत ठेवून आरोपी सय्यद अजहर सै.अकबर याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून इंडिगो गाडी क्र. एम. एच.२0 बी.सी.५0७५ या कारसह सहा कट्टे गुटखा पकडला. सदर गुटख्याची किंमत ४८६00 रुपये आहे. गुटखा पकडल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे बुलडाणा यांच्या ताब्यात आरोपी व गुटखा देऊन पुढील कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी हे करीत आहे. ही तीन दिवसातील अमडापूर पोलिसांची मोठी कारवाई असल्याने अवैध धंदे करणार्‍यांना मोठा हादरा बसला आहे. 

Web Title: Gadda of 1.5 lakhs seized in Amadapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.