नाफेडचे ३ कोटी ७ लाख शेतमालाचे चुकारे थकीत, शेतक-यांच्या डोक्यावर सावकारी कर्जाचा  डोंगर  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 02:02 PM2018-02-14T14:02:09+5:302018-02-14T14:02:23+5:30

गुलाबी बोंडअळीनंतर गारपीटीमुळे शेतक-यांवर संकटाची मालिका सुरू असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत

Farmers are in tension because of loan | नाफेडचे ३ कोटी ७ लाख शेतमालाचे चुकारे थकीत, शेतक-यांच्या डोक्यावर सावकारी कर्जाचा  डोंगर  

नाफेडचे ३ कोटी ७ लाख शेतमालाचे चुकारे थकीत, शेतक-यांच्या डोक्यावर सावकारी कर्जाचा  डोंगर  

Next

लोणार : गुलाबी बोंडअळीनंतर गारपीटीमुळे शेतक-यांवर संकटाची मालिका सुरू असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच शेतकरी हितासाठी शासनाने नाफेडतर्फे सुरु केलेल्या हमी भाव केंद्रावर मुग, उडीद, सोयाबीन विकल्यानंतरही ३ कोटी ७ लाख रूपयाचे चुकारे थकीत असल्यामुळे  शेतक-यांच्या डोक्यावर सावकारी कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विवाह समारंभ मोडण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.  

शासकीय हमी भाव केंद्रावर तूर विकण्यासाठी लोणार तालुक्यात गेल्या महिनाभरात अंदाजे ५ हजार शेतकºयांनी ऑनलाईन नोंदणी केली. मात्र तूर खरेदी केंद्र सुरु होत नसल्याने अनेक शेतक-यांना व्यापा-यांना तूर विकून पैसे मोकळे करून घेतले. उशिरा तूर खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकरी मात्र अधिकच दुखावला गेला आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी शासकीय खरेदी केंद्रावर मुग, उडीद व सोयाबीन शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने विकला. शासकीय हमीभाव मिळेल आणि पैसही लवकर मिळतील या अपेक्षेने शेतकºयांनी विकलेल्या शेतमालाचे मात्र अजून पैसे मिळालेले नाहीत. तर शेतक-यांजवळ असलेली जमा पुंजी संपलेली असून मुलीच्या विवाहापासून तर शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्ज वसुलीसाठी बँकेने तगादा लावल्याने ३ ते ५ टक्के व्याजदराने सावकराकडून कर्ज घेतले जात आहे. नाफेड खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे न मिळाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकºयांनी नगदी पैसे मिळण्यासाठी कमी भावात व्यापाºयांना मला विकत आहेत. कमी भावात शेतमाल विकल्यामुळे हाती पुरेसा पैसे नाही. त्यात कर्ज फेडायचे की, लग्न समारंभ करायचे की, मुलांचे शिक्षण करायचे अशा दुविधा अवस्थेत शेतकरी सापडला आहे.  

लोणार तालुक्यातील ७१९ शेतकºयांचा ४ हजार ९८० क्विंटल उडीद नाफेडने खरेदी केला आहे. तर २ कोटी ६८ लाख ९२ हजार रकमेपैकी ५३४ शेतकºयांना १ कोटी ८७ लाख ९४ हजार रूपयाचे वाटप करण्यात आले आहे. मात्र उडीदाचे अजून ८० लाख ९८ हजार रुपये नाफेडकडे बाकी आहेत. तसेच  ३९८ शेतकºयांनी २ हजार १९३ क्विंटल मुग नाफेडला विकला. १ कोटी २२ लाख २५ हजार रूपये रकमेपैकी ३३४ शेतकºयांना १ कोटी ६ लाख ५२ हजार रुपये देण्यात आले. मात्र अजूनही ६४ शेतकºयांचे १५ लाख ७३ हजार रुपये नाफेड कडे बाकी आहेत. याशिवाय २६ शेतकºयांनी ५१८ क्विंटल ७२ किलो सोयाबीन नाफेडला विकली. १५ लाख ८२ हजार रकमेपैकी २२ शेतकºयांना १२ लाख ९९ हजार रुपये देण्यात आले. मात्र अजूनही ४ शेतकºयांचे २ लाख ८३ हजार रुपये नाफेडकडे बाकी आहेत. 
 

Web Title: Farmers are in tension because of loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी